कंधार ; प्रतिनिधी
प्रत्येक भारतीयांना जय जवान जय किसान म्हटले की रोमारोमात शौर्य संचारते.आपल्या परिवारा पासून कोसोदूर राहून भारत मातेची रक्षा डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र गस्त घालत माझा भारतीय शूर जवान करीत असतो.वंदनीय भारतीय सैनिकांना रक्षाबंधन सणानिमित्त मन्याड-गोदा खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून शालेय भगीनींच्या ३३३३ राख्या अन् ३३३३ सदिच्छापत्रा सोबत १५ फुटी महाराखी गेली दहा वर्षापासून अखंडितपणे भारतीय सीमेवर सेवारत असलेल्या वीरांना रक्षाबंधनाच्या औचित्यानेच सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व सर्व टिमच्या वतीने कंधार पोलिस स्टेशन येथे कार्यक्रम घेऊन भारतीय डाक विभागामार्फत सीमावर्ती बटालियनला पाठवत असतात.
सर्वात पहिली बटालियन म्हणजे २६२ फिल्ड रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर मा. चंदन कुमारजी,मा. सुभेदार मेजर अमरसिंहजी अन् हवालदार मा. शिवहार कागणे भोजुचीवाडीकर यांचे बटालियन कडे १५ फुटाची महाराखी पाठवतो. या मन्याड-गोदा खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमाचा सन्मान जय जवान सहकारी (म) पतसंस्था धनेगाव ता.जि.नांदेड यांच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त नंदीग्राम नगरीतील सेंट्रल पार्क,गुरु गोविंदसि॔ग सिंग स्टेडियम समोर गोकुळ नगर नांदेड येथील सभागृहात शौर्यपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामरावजी थडके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहूणे मा.कर्नल के.रंगाराव व मा. ब्रिगेडियर सुमंत दशरथ (नि.)-संभाजी नगर, आणि मा.लेफ्टनंट कमांडर सोपानराव डोके(नि.) समर्थ हस्ते करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित मान्यवर व देशभक जनसमुदायांनी उभे राहून जणुकांही स्फूर्तिदायक उपक्रमास मानवंदनाच दिली.हा सन्मान माझा नसून पूर्ण मन्याड खोर्याच्या स्फूर्तिदायक उपक्रमाचा आहे.या रक्षाबंधनाच्या देशभक्तीच्या उपक्रमात सहभागी शालेय भगीनी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक,सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व सर्व टिमचा हा बहुमान आहे.मन्याड-गोदा खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी तोंड भरुन कौतूक केले.
या प्रसंगी माजी सैनिक जिल्हा संघटनेचे कॅप्टन मा.प्रकाश कस्तूरे सर,कॅप्टन कपाळे सर,बालाजी चुकलवाड सर,हयुम पठान, लक्ष्मण देवदे, ज्ञानेश्वर डुमणे,प्रविण देवडे (कोरोना योध्दा) प्रा.डाॅ.पुरणशेट्टीवार मॅडम, प्रा.स्वामी मॅडम प्रा.पाईकराव सर आणि कंधार येथील माजी सैनिक संघटनेचे अर्जुन वाघमारे सर,कल्याणकर सर,सूर्यवंशी सर,माझी उर्जा अधिश्वरी सौ.संगीता एमेकर, मुलगा दृष्टांत एमेकर,मुलगी दृष्टी एमेकर आणि आमच्या गाडीचे सारथी संजय कंधारे सह आदी जण उपस्थित होते.तसेच वीर पिता,वीर माता,वीर पत्नी, आजी व माजी सैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन रेडिओ स्टार अन्वर भाईसाहब यांनी देशभक्तीपर शेरोशायरी करुन कार्यक्रमास चार चांद लावले.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार