कौठा ( प्रतिनिधी – प्रभाकर पांडे )
कौठा ता.कंधार येथील गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग 161 A नांदेड बिदर हा रस्ता महात्मा बसवेश्वर चौक ते मॉडर्न इंग्लिश स्कूल पर्यंतच्या रस्त्याचे काम रखडले होते हि बाब चेअरमन प्रताप देशमुख यांनी आमदार साहेबांच्या कानावर टाकली लगेच आज कौठा येथे लोहा-कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनी उपस्थित राहुन सर्वप्रथम महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन महात्मा बसवेश्वर चौक ते मॉडर्न इंग्लिश स्कूल कौठा इथपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करून इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे अभियंता राव सर व किरण पाटील अभियंता यांना या रस्त्याच्या कामासंबंधीत आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनी योग्य ते सूचना दिल्या व कामाला तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या वयस्कर नागरीकांची शाळकरी मुलांची होणारी हेळसांड थांबली पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्या यावेळी कौठा गावकरी मंडळी यांच्या वतीने आमदार शामसुंदरजी शिंदे साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी देवीदास पा.कदम,प्रताप देशमुख सेवा सहकारी सोसायटी चेअरमन कौठा, ओमराजे पा.शिंदे,रवि पा.कदम,राजु भंडारे सरपंच तेलुर,बसवेश्वर मडके,भुजंग देशमुख, संतोष देशमुख, संभाजी पवळे,मकदुम शेख,गूलाब सेठ,व कौठा गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते…