(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)
पेटवडज येथील गावात ग्रा.पं.विभाग मा.मुख्य.कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे आदेशानुसार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कंधार तालुक्यातील पेठवडज येथील गावात दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद नांदेड यांचे आदेशानुसार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत -महोत्सवाचे औचित्य साधून व मा.जिल्हाधिकारी साहेब, कार्यालय नांदेड यांच्या आदेशानुसार दिनांक 14.9.2023 ते 17.09.
.2023 रोजी पासून विविध कार्यक्रमाचे ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज यांच्या वतीने आयोजन करण्यात आले तरी दिनांक 16.9. 2023 रोजीच्या मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथील सरपंच सौ.अनिता दत्ता गायकवाड व तसेच मा.श्री.नारायण काळबा गायकवाड साहेब
,व तसेच ग्रा.पं.का. पेटवडज सचिव तथा ग्रामसेवक,(ग्रामविकास अधिकारी) मा.श्री.शिंदे साहेब यांनी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
यावेळी सौ.अनिता दत्ता गायकवाड (सरपंच ग्रा.का.पेटवडज), व तसेच मा.श्री.दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच प्रतिनिधी) व तसेच मा.श्री.खुशाल आनंदरावजी राजे उपसरपंच (प्रतिनिधी,ग्रा.कार्यालय पेटवडज) व सर्व सदस्य व ग्रा.का. पेठवडज सर्व कर्मचारी वर्ग व मा.श्री.कैलास शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व तसेच या ग्रामपंचायत कार्यालय पेटवडज येथील सचिव मा.श्री.एम.बी.शिंदे साहेब,व गावातील प्रतिष्ठित नागरिक व तसेच कर्मचारी उपस्थित होते.