मुखेड: (दादाराव आगलावे)
सेवेकऱ्यांचे कार्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे, परिपूर्ण कार्य काय आहे याची माहिती अनेकांना नाही. केंद्रातील आरती आणि महाराजांची सेवा एवढेच कार्य नसून ‘केंद्र’ म्हणजे जेथे मानवी समस्या सोडविल्या जातात असा केंद्रबिंदू म्हणजे ‘केंद्र’ होय. ‘केंद्र’ मानवी समस्या सोडविण्यासाठी आहे,
केंद्रातील ज्ञान मार्ग प्रत्येकाकडे पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन गुरुमाऊलीपुत्र आबासाहेब मोरे यांनी केले.
मुखेड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नागेंद्र मंदिर, या केंद्रास भेट दिल्यानंतर सेवेकऱ्यांना संबोधित करत होते. प्रारंभी मुखेड केंद्राच्या वतीने आबासहेबाचे विधीवत पूजन करून सत्कार करण्यात आला.
आबासाहेब मोरे पुढे म्हणाले की, आज प्रत्येकाची समस्या आहे. दररोजचा पेपर उघडा बातम्या वाचा दररोज 99 टक्के समस्यांच वाचायला मिळतील. एखादा टक्के आनंदाची बातमी अशेलही चारही परंतू चारही बाजूंनी आपण समस्यांनी वेढलो आहोत. या समस्यावर वाटचाल करायची असेल तर त्याला एकच मार्ग आहे तो सेवा मार्ग आहे. या मार्गाने समस्या नष्ट केल्या जातात. येथे केवळ मार्गदर्शन नाही एखादी समस्या असेल तर ती या कार्यातून समूळ नष्ट केल्या जातात जर ती समस्या दूर करायची असेल त्यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला नियोजन दिलेले आहे.
लहान मुलांच्या फार मोठ्या समस्या आहेत हॅब्रीड व सिडलेस अन्न खाऊन एक तर मुलं बाळ होत नाहीत, मुले झालीस तर त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न, शाळेतील त्यांना समजत नाही क्लास करून पैसे भरून मुले म्हणावे तेवढे हुशार होत नाहीत त्यानंतर वाईट मुलांची संगत हे सर्व सोडवण्यासाठी आपण आपणास गुरुमाऊलींनी ‘बालसंस्कार’ हा विभाग दिला आहे.
यात मुलांचे एकही प्रश्न राहणार नाहीत. यासाठी गावागावात बालसंस्कार केंद्र झाली पाहिजेत. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील निरोगी राहतील राष्ट्रभक्ती निर्माण होईल यासाठी मुलावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.
मोबाईलचा वापर जास्तीचा होत आहे हे सांगताना आबासाहेब म्हणाले की, आपण मोबाईलवर जास्तीचा वेळ वाया घालवायचा नाही आपल्या जीवनाचा टॉकटाइम वाया घालवू नका, पैशापेक्षा जीवनाचा टॉक टाईम महत्त्वाचा आहे मोबाईलचा टॉकटाइम चेक करता येतो पण जीवनाचा टॉकटाइम चेक करता येत नाही.
रिकामी बडबड करण्यापेक्षा चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा असेही आबासाहेब यांनी सल्ला दिला.
शेती विषयी बोलताना आबासाहेब पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कुठल्या मुहूर्तावर कोणते धान्य पेरायचे, कसे पेरायचे हे ज्ञान सर्वापर्यंत आपल्या सेवेकऱ्यामार्फत गेले पाहिजे. स्वामींची आरती-पूजा ही बॅटरी चार्ज करण्यासाठी आहे, ऊर्जा वाढविण्यासाठी आहे. चार्ज केलीली बॅटरी वापरली नाही तर लवकर खराब होते तसेच सेवेकऱ्यांचे आहे, आपण ज्ञान घेतलं पण ते इतरांना सांगितलं नाही तर ते ज्ञान जास्त दिवस टिकत नाही.
सेवेकर्यांनी खूप काही माहिती सांगण्यापेक्षा अधिक सोप्या पद्धतीने सांगितली पाहिजे. नियम सांगण्या ऐवजी स्वामी महाराजांच्या ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रात येवढी ताकद आहे की ते मानवी मन परिवर्तन करू शकते. स्वामींच्या मंत्रामुळे प्रत्येकाचे मनोबल वाढेल मनात वाईट विचार येत असतील तर श्री स्वामी समर्थ व गायत्री मंत्राचा जप करा, मनातील वाईट विचार निघून जातील व वाईट विचार येणारच नाही हा संदेश सेवेकऱ्यांनी घराघरात पोहोचवावा म्हणजे सर्वांचे मन प्रसन्न होतील.
भक्ती ही मनातून करा त्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. मानवी समस्या सोडविण्यासाठी नवीन कार्य, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कुलदैवताचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. देवाची आपण थोडी पूजा करतो आणि जास्त मागून घेतो आपण सेवा अशी करा तो कोणीही जाती धर्माचा असो त्या सर्वांपर्यंत मार्ग पोहोचला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत एकलारे यांनी केले. यावेळी शंकर मामा पांचाळ, व्यंकटेश कवटीकवार, उत्तम कोडगिरे, व्यंकट चिद्रावार, शंतनू कोडगिरे, सौ.सिंधुताई इंगोले, श्रीमती अल्का चिद्रे , सौ.सुलोचना अडगुलवार, सौ. महानंदा शेळके, आश्विनी चिंतमवाड, पूजा दमकोंडवार, कृषी प्रतिनिधी जगदीश जाजू, राजेश्वर पाटील इंगोले, लक्ष्मण वडजे, भास्कर पोतदार, विनोद पोतदार, प्रमोद पोतदार, मुकेश तमशेट्टे, प्रविण चव्हाण, तुळजा चव्हान, कू.राणी चौधरी, कु. साक्षी कुलकर्णी, कु. रेणूका पोतदार, साक्षी संगेवार, विजयकुमार बंडे, बालाजी पईलवाड, महेश महाले, हरिदास होकर्णा, बाल संस्कारसह १८ विभागातील अनेक प्रतिनिधी, मुखेडसह परभणी, नांदेड येथील असंख्य महिला पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.