( पेठवडज प्रतिनिधी,
कैलास शेटवाड, )
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 17 सप्टेंबर 2023 रोजी समाज जनजागृती महानायक स्व.आयलाजी पंदीलवाड यांचा कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी कंधार/ लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी धावती भेट घेतली . यावेळी पेठवडज येथील श्री.राजेश दत्ता पंदीलवाड , श्री.अविनाश तेलवाड , तसेच राजू शंकर घुमलवाड , बालाजी घुमलवाड , श्री.रावसाहेब मुंजाजी पंदीलवाड ,शरद घुमलवाड व तसेच सर्व समाज बांधव व विविध संघटनेचे कार्यकर्ते व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते .
शासकीय विश्रामगृह कंधार येथे भोई समाजाचे समन्वय समिती व जिल्हाध्यक्ष नांदेड यांचे तर्फे स्व.आयलाजी पंदीलवाड यांना आदरांजली वाहिन्यात आली .
पेटवडज गावातील श्री.राजेश दत्ता पंदीलवाड व श्री.राजेश शंकर घुमलवाड श्री.राजेश दत्ता पंदीलवाड व तसेच भोई समाज जिल्हाध्यक्ष राजू अण्णा मामुलवार व श्री.श्रीराम डुबुकवाड ग्रामपंचायत कार्यालय सरपंच बाचोटी , माणिकराव चोपवाड सभापती व जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पवार , डफडे सर व डी.के. वाघमारे व हरिभाऊ निलेवाड , रुखमाजी प्रेमलवाड,अलगुलवार,गजानन प्रेमलवाड,माधवराव गंदपलवाड, रामेश्वर निलेवाड,मुकुंदा अडगुलवार,
शिवा प्रेमलवाड,शिवराज निलेवाड कृष्णा टोकलवाड, नवनाथ फुलवले व संभाजी डुबुकवाड,व वाघमारे , गायकवाड ,विश्वनाथ पांगरेकर साहेब,पांडुरंग जेलेवाड ,व वसंतराव निलेवार मा.सरपंच नवरंगपुरा,व प्राध्यापक मुक्तेश्वर बटलवार ,व नारायण येरलवाड व पंदीलवाड यादव व पंदीलवाड व दिगंबर पंदलवाड आदीसह समाज बांधव व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभलेली होती .
ए डी पंदीलवाड यांच्या आठवणींना उजाळा
यावेळी अत्यंत प्रतिकूल घडून पाहणारा एक हळव्या मनाचा व प्रत्येकाच्या मनामध्ये जागा निर्माण करणारा असा प्रेमळ व्यक्तिमत्व असणारा हा नेता आज सर्व समाजातून हरवलेला आहे त्यामुळे ए.डी.पंदीलवाड सर हे शैक्षणिक क्षेत्रातील हिराचे मोते होते व सामाजिक बांधिलकी राखता व बहुजन समाजाला आपले विचार व वैचारिक पातळीतून ओळख करून दिल़े व तसेच बहुजन समाजाला व भोई समाजाला व गोरगरिबांच्या मुला आणि मुलींना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याबाबत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले
व यासाठी त्यांनी जीवनाचे अनमोल क्षण अहोरात्र प्रयत्न करून भोई समाजासाठी योगदान दिले व जगाला प्रकाश जसा भेटतो तसा अंधाराला प्रकाश भेटतो. त्याप्रमाणे हे,खासदार,आमदार यांचे मतदान आपल्या बहुजन व सर्व समाजावर अवलंबून असल्याचा अनुभव त्यांनी बोलताना व्यक्त केला होता व त्यांनी त्यांच्या विचारातून सर्व भोई समाज बांधवांना व सर्व इतर समाजाला अनुभवाचे बोल सांगितले
होते व तसेच आमदार व खासदार आपल्या बहुमूल्य मतावर विजयी होऊ शकतो व कुठलाही लोकप्रतिनिधी व आमदार व खासदार व नेता चार-पाच हजार मताने पडतो या सर्व बाबी भोई समाजाला व बहुजन समाजाला समीकरण पटवून दिले आहे व माणूस जगण्यासाठीच नव्हे तर केवळ जिंकण्यासाठी जन्माला आलेला आहे व आपल्या इच्छा आणि आकांक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेला आहे असे त्यांनी त्यांच्या विचारातून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे सांगितले होते व आपलं स्वप्न साकार करायचा असेल तर ते शिक्षणात आहे व बुद्धी काही मोल होता है तोलने वाला चाहिये व सोचनेसे सुविचार होता है सोचने वाला चाहिये असे व रेती मे मोती होती है धुंडने वाला चाहिये असे विचार स्व.आयलाजी धोंडीबा पंदीलवाड सरांनी आपल्या विचारातून व साहित्यातून विचार व्यक्त करत बहुमूल्य विचार
मांडलेले होते.व सरांच्या अंगी नम्रता व गोडवा होता हा सर्वांनी अनुभव घेतलेला आहे सरांचा परिवर्तन अभ्यासपूर्ण कोणत्याही विषयावर अष्टपैलू असा कर्तव्यदक्ष भोई समाजाचा नेता बोलणारा अहो रात्र परिश्रम घेणारा कर्तव्यदक्ष असा नेता वक्ता होता तसेच नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा होता व हळव्या मनाचा व बहुजनाचा म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर व व तसेच शाहू महाराज व तसेच शिवाजी महाराज च्या विचाराने पुरोगामी विचाराने चालणारा होता तरी हा बहुजन समाज हितवादी व भोई समाजाचा कर्तव्यदक्ष निष्ठावंत असा नेता आपल्या सर्व समाजातून कायम हरवलेला आहे त्यामुळे भोई समाज समन्वय समिती नांदेड यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह कंधार येथे दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून साधून सर्व सामाजिक कार्यकर्ते व तसेच सर्व भोई समाजाचे कार्यकर्ते व तसेच लोकप्रतिनिधी व तसेच सरांचे स्नेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .