हैद्राबाद मुक्ती लढा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा भाग होता – प्रा.डॉ.बालाजी चिरडे यांचे प्रतिपादन

कंधार,( विशेष प्रतिनिधी  , मिर्झा जमिर बेग )

 

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे भारताला टप्याटप्याने स्वातंत्र्य मिळाले.भारतातील ५६५ संस्थानिकांपैकी ५६० संस्थाने भारतात विलिन झाली.पाच संस्थानिकांनी भारतात विलिन होण्यास विरोध केला.त्यापैकी हैद्राबाद संस्थान एक आहे.

हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होवू नये यासाठी निजामाने गल्ली,मोहल्ला, तालुका,जिल्हा ते राजधानी हैद्राबाद पर्यंत आपली व्यवस्था लावली.वर्तमानपत्र काढणे आणि वाचणे यावर हैद्राबाद संस्थानात बंदी होती.ब्रिटिशांपेक्षाही निजाम क्रूरपणे लागत होते.येथील मुस्लिम महिलांनाच नाही तर हिंदू महिलांनाही पडदा व भुरका पध्दतीत वागावे लागत होते.असे प्रतिपादन प्रा.डॉ.बालाजी चिरडे यांनी कंधार येथे शिवाजी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात केले.

अखंड भारतात मराठवाडा सहभागी झाला पाहिजे यासाठी येथील जनतेने निजामाविरुध्द लढा दिला.या लढ्यात कंधार तालुक्यातील ५९ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाली.या हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा ७६ वा विजयी दिन,या लढ्यातील हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सत्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा वर्धापनदिन व साताहिक जयक्रांतीचा ६६ वा वर्धापनदिना निमित्त गुराखीपीठ श्री शिवाजी मा. व उ.मा.विद्यालय हुतात्मा माणिकराव काळे रोड कंधार येथे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वतंत्र सैनिक तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे,प्रमुख उपस्थिती ग्रामीण लेखिका तथा मुक्ताई ऑफसेटच्या संचालिका
चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.महेश धर्मापुरीकर यांनी केले.या कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ.सुर्यकांत जोगदंड व प्रा.शंकरराव आंबटवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हैद्राबाद मुक्ती लढ्यातील हौतात्म्य पत्करले त्यांचे नातेवाईक यांचा गौरव व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन.ब्रिटीशांची येथील सत्ता पाडण्यासाठी अनेक भारतीयांनी प्रयत्न केले.परंतू मराठवाड्याची परिस्थिती बघितली तर येथे राजसत्ता अस्तित्वात होती.

या संस्थानाला अखंड भारतातील स्वतंत्र राज्य हवे होते.निझामाचा मागणीस विरोध करत होते.हा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा,यासाठी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी दरवर्षी दोन दिवसीय रथयात्रा काढते.व हैद्राबाद मुक्ती दिनाच्या निमित्ताने उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.

संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.पांडुरग पांचाळ तर उपस्थितांचे आभार श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *