कंधार ; प्रतिनिधी
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रि भाऊसाहेब बार्हाटे हे काल म्हणजेच दि. १४/०९/२०२३ रोजी सायं. ६:०० वा. मौजे लाठ खुर्द येथे मुक्कामी येवुन गावातील नागरिकांसोबत दत्त मंदिरात ग्रामगितेतील प्रार्थना, शेतकर्यांशी संवाद करुन सामुहिक भोजनाचा आस्वाद घेतला.
व नंतर १०:३० पर्यंत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा नांदेडचे गोविंद महाराज व त्यांच्या सहकार्यांनी संत तुकडोजी महाराज, जगद् गुरु तुकोबाराय, संत गाडगेबाबा, अशा वेगवेगळ्या संतांनी सबंध मानव जातीच्या ऊद्धारासाठी रचलेले भजन, किर्तणाच्या माध्यमातुन गाववासियांचे प्रबोधन करण्यात आले.
दुसर्या दिवशी पहाटे ४:३० वा. प्रात:विधी आटोपुन श्रि भाऊसाहेब बार्हाटे साहेब व गुरुदेव सेवा मंडळातील सदस्यांनी ऊपविभागिय कृषि अधिकारी नांदेड, दत्तकुमार कळसाईत , तालुका कृषि अधिकारी कंधार विठ्ठल गित्ते , व मंडळ कृषि अधिकारी कार्यालय बारुळ अंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी, गावातिल मा. सरपंच संजय घोरबांड, विठ्ठल घोरबांड, गावातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरीक, व शेतकरी बांधव यांच्यासोबत साडे पाच ते साडे सहा पर्यंत प्रार्थणा, योगा, प्राणायाम ध्यानसाधना व व्यायाम करुन आपल्या जिवनात त्याचे महत्व पटवुन दिले.
सात ते आठ या वेळेत सकाळचा चहा, नाष्टा करुन आठ ते साडेदहा पर्यंत गावातील मुख्य रस्त्याने प्रभातफेरी काढुन ग्रामदैवत श्रि मारुती मंदिरात शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले.
सदरिल शेतकरी सभेमध्ये ऊपविभागिय कृषि अधिकारी नांदेड श्रि दत्तकुमार कळसाइत साहेब यांणी PMKSY, MAHA DBT, MIDH, PMFME, आणि ग्रामबिजोत्पादन अंतर्गत सर्व योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शण केले. तर तालुका कृषी अधिकारी कंधार श्रि विठ्ठल गित्ते यांनी कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची सविस्तर माहिती देताना MREGS अंतर्गत व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजणेची सविस्तर माहिती दिली.
आणि शेवटी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रि भाऊसाहेब बार्हाटे यांणी अतिषय साध्या सरळ आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांणा समजेल ऊमजेल अशा भाषेतुन शेतकर्यांशी संवाद साधताना विविध पिकावरील वेगवेगळ्या मित्रकीडी, शत्रुकीडींची ओळख व नियंत्रण हे तर सांगितलेच पण त्याचबरोबर ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, नागरिकांच्या अडचणी जाणुन घेवुन त्यावर आपण काय ऊपाय करु शकतो ह्यावर देखिल प्रकाश टाकताना गुटखा, दारु यांचे व्यसनमुक्ती यावर देखिल मार्गदर्शण केले.
नंतर कृषि विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, व शेतकरी बांधव हे विष्णु ईंगोले, संतोष गवारे, विठ्ठल घोरबांड यांच्या शेतावरील शेडनेट मधिल भाजिपाला बिजोत्पादण, कापुस, सोयाबिण या पिकांची प्रत्यक्ष पाहणि करुन विविध रोग, कीडींची ओळख व त्यावरील कमी खर्चीक व प्रभावी ऊपाय यावर शेतकर्यांशी संवाद साधला. व नंतर श्रि संत वैरागि महाराज शेतकरी ऊत्पादक कंपणीच्या कार्यालयास भेट देवुन मौजे लाठखुर्द येथिल ग्रामस्थांचा निरोप घेतला.
दुपारी १२:०० वा. मौजे मंगलसांगवी येथे बार्हाटे यांनी श्रि व्यंकटी नामदेव कदम यांणि PoCRA अंतर्गत स्थापन केलेल्या जिजाऊ शेतकरी स्वयं सहाय्यता गटाच्या औजारेबॅंकेची पाहणि करुन गटाच्या सभासदांशी व लाभार्थि शेतकर्यांशी औजारे बॅंकेच्या संदर्भात चर्चा करुन जमा खर्चाच्या नोंदी ठेवण्याच्या सुचना केल्या. तर कळसाईत साहेबांनी याच योजणे अंतर्गत प्रभाकर नानाराव कदम, गंगाधर वाघमारे यांच्या ठिबक व तुषार संचाची पाहणी केली.
दुपारी १:३०वा मौजे नंदणवन येथे PoCRA अंतर्गत सुरेश गंगाधर भागानगरे यांच्या कल्पतरु शेतकरी स्वयंसहाय्यता गटाने सोया पनीर व सोया बायप्राॅडक्ट या प्रकल्पास भेट देवुन पाहणि करुन दुपारचे सामुहिक जेवण केले. त्यानंतर श्रि बालाजि भागानगरे यांच्या सोयाबिन व सौ. मनकर्णा गंगाधर भागानगरे यांच्या कापुस पिकाची पाहणी करुन कीड व रोगांविषयी मार्गदर्शन केले. आणि नंतर ४:००वाजता बारुळ येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस ऊत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजणा सन २०२३-२४ अंतर्गत लागवड केलेले लाभार्थि गोपाळ मामा लाठकर यांच्या कापुस पिकाची पाहणी करुन ऊत्पादन खर्च कसा कमी करता येईल याविषयी ऊपस्थित शेतकर्यांणा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. श्रि बार्हाटे साहेबांणी सविस्तर मार्गदर्शण केले.
त्यानंतर ऊमेश माणे यांच्या सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या मिरची प्लाॅटवर भेट देवुन पाहणी केली. आणि शेवटी मधुकर महाराज बारुळकर यांनि बेडवर टोकण पद्धतीणे लागवड केलेल्या सोयाबिण प्लाॅटची पाहणी करुन ऊपस्थित शेतकर्यांशी आजचा शेतकरी, त्यांच्या अडचणी आणि शेती व्यवसायातील आव्हाणे यावर शेतकर्यांसोबत संवाद साधला. आणि सायं ५:४५ वाजता आजचा मुक्काम असलेल्या बोरी बु. या गावाकडे प्रस्थान केले.
आजच्या संपुर्ण दिवसभरात तालुका कृषि अधिकारी श्रि विठ्ठल गित्ते साहेब, मंडळ कृषि अधिकारी बारुळ श्रि सुनिल राठोड साहेब, कृषि पर्यवेक्षक श्रि अशोक राठोड, श्रि वारकड साहेब हे दौर्यामध्ये सोबत होते.
तर मौजे लाठखुर्द येथिल कृषि सहाय्यक वसंतराव मिटके, मंगलसांगवि, नंदणवन, बारुळ चे कृषी सहाय्यक परमेश्वर मोरे, गोविंद तोटेवाड, सतिष गोगदरे, मधुकर राठोड, पल्लवि कचरे, बालाजी डफडे, सोपाण ऊबाळे या सर्वांणी दौर्यादरम्यान परीश्रम घेतली .