( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड.)
पेठवडज ता.कंधार येथील गावात जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी येथील मा.श्री. मनोज जरांगे पा.यांना पाठिंबा म्हणून दिनांक 7.9.2023 रोजी पासून उपोषणाला बसलेल्या मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर पेठवडज येथील गावात साखळी उपोषणाला दिनांक 14.09.2023 ते आज 19. 9.2023 रोजी उपोषणाचा सातवा दिवस असून आज दिनांक 19 9 2023 रोजी गणेश चतुर्थी मूर्ती स्थापना निमित्त सर्व उपोषण कर्ते या ठिकाणी उपोषणास बसलेले होते.
तरी आज रोजी त्यांनी घराकडे न जाता उपोषणाच्या ठिकाणावरून त्यांनी कुठेही हाललेले नाहीत .
यावेळी उपोषण कर्ते मा.श्री.व्यकटरावजी तुकाराम पांढरे (नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी चेअरमन) व तसेच
मा.श्री.नामदेवरावजी कंधारे पा. (माजी उपसरपंच ग्रा.का.पेठवडज) व तसेच मा.श्री.संभाजी उर्फ पप्पू दामले ( ग्रा.पं.सदस्या प्रतिनिधी पेटवडज) व तसेच श्री.देवानंद रामतीर्थे (सामाजिक कार्यकर्ते) व श्री.प्रभाकर गोडबोले व श्री.मारोती डावकोरे व मा.श्री.नागनाथ राव पा. जोगदंड व सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व सकल कुणबी मराठा सर्व समाज बांधव उपस्थित होते .