माझे वडील श्री अशोक माधवराव कुलकर्णी हे दि. १४जुलै पासून डॉ. हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद येथे उपचार घेत होते. ते दि.१३ ऑगस्ट रोजी कोरोना या दुर्धर अजारावर मत करून सुखरूप घरी पोहचले आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यापासून रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी यांनी माझ्या वडिलांना म्हणजे रुग्णाला अतीशय तळमळीनं आणि आपल्या परिवारा प्रमाणे वागणुकीतून उपचार करुन या गंभीर अजरतुन मुक्त केले. हा त्यांचा सेवा आणि समर्पित भावाने आम्ही सर्व कुटुंबीय आणि आमच्या सारखे असंख्य लोक जे येथे उपचार घेत असतील व उपचार घेऊन बरे झाले असतील ते सुद्धा या सर्व हेडगेवार रुग्णालयांच्या डॉक्टर व त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासुन खूप खुप धन्यवाद देत असतील व त्याच्याबद्दल कृतज्ञाभाव व्यक्त करत असतील.
मी व माझा सर्व परिवार हा त्यांचा नम्रपणा व सेवाभाव पाहून खुप धन्य झालोत.
आमचे सर्व डॉ. हेडगेवार रुग्णालय व परिवारास अनंत शुभेच्छा आणि खूप खुप धन्यवाद.
आपले नम्र,
कुलकर्णी परिवार,
ता. गेवराई जि.बीड