माळाकोळी:
डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो याच निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात वर्षभर व कायमच उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींचा कार्याचे कौतूक व्हावे व यातून इतरांनाही प्रेरणा मिळून शिक्षणाचा दर्जा उंचावा यासाठी कायमच सामाजिक व शैक्षणिक कामात अग्रेसर असणार्या व मागील दहा वर्षापासून शिक्षकदिनी शिक्षकांचा गूरुगौरव पूरस्कार देऊन येथील लोकमान्य प्रतिष्ठाणकडून गौरव करण्यात येत असतो यंदा या पूरस्कारासाठी जि.प.हायस्कूल आष्टूर येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक श्री.सतिश पंढरीनाथ तिडके यांचा लोकमान्य प्रतिष्ठाणच्या वतीने शाल श्रीफळ पूष्पहार व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सतिश तिडके यांनी आपल्या पंचविस वर्षाच्या कार्यकाळात अनेक उत्कृष्ठ कार्य केले असून त्यांना आजवर अनेक पूरस्काराने विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आले असून नांदेड आकाशवाणीने सूध्दा त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष मूलाखात आकाशवाणीवर प्रसारीत केली होती विध्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय असलेल्या सहशिक्षक सतिश तिडके यांची गूरुगौरव पूरस्कारासाठी निवड केल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला
सतिश तिडके यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आज शिक्षकदिनी गूरूगौरव पूरस्कार देऊन गौरविताना मनस्वी आनंद होत असल्याची भावना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विनायक जोशी यांनी व्यक्त केली .
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष जगन्नाथ तिडके यांनी तर रामेश्वर महाराज केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सतीश तिडके यांनी प्रतिष्ठाणकडून झालेल्या सन्मानाबददल सर्वाचे आभार मानले यावेळी विनायक जोशी नागनाथ पूरी रामेश्वर महाराज जगन्नाथ तिडके वैभव पांचाळ आदी उपस्थित होते