क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
श्री शिवाजी विद्यालय बारुळ या ज्ञानालयात सेवा बजावत असतांना..आमच्या विद्यालयाच्या इयत्ता ९ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी ” जिनियस “हे शास्त्रज्ञाची माहिती संकलित करुन एक सुंदर हस्तलिखीत तयार केले.त्या हस्तलिखीतास माझे मार्गदर्शन होते.म्हणुन मार्गदर्शनावर एखादी चारोळी रहावी असे वाटले.सिनीअर प्राध्यापका पासून प्राथमिक शिक्षका पर्यंत विचारणा केली.पण एका महिन्यात कोणीही चारोळी तयार करुन दिली नाही. ही खंत माझ्या मनाला त्या काळात बोचत होती.त्या विचारात असतांनाच सहजच माझ्या घरी वामकुक्षी घेण्यासाठी डाळजतल्या पाट्यावर पहुंडलो असताच………..एक…चारोळी सुचली.त्या आधी साहित्य लेखनाचा गंधही नव्हता..
कुंभार घडवितो मातीचा गोळा ॥
विद्यार्थ्यांचा ज्ञानावर डोळा॥
मार्गदर्शकांन मुळे लागतो लळा।
अन् आभ्यासाने होतो रे गोळा॥
ही चारोळी सुचताच खडाकन उठलो अन् एका ती चारोळी लिहिलो….एवढा आनंद की मला आकाश ठेंगणेच झाले.तो दिवस म्हणजे ६ सप्टेंबर २०१० वेळ दुपारी २:४५ ची.त्या दिवसा पासून कवि मनाचा वाढदिवस आरंभ झाला….
.दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा बोलाबोला–९८६०८०९९३१