कंधार ;
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्ताने संपन्न होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे आणि मामा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने कंधारच्या शिवाजी नगरात येथे दि.५ सप्टेंबर रोजी शहरातील गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
हरहुन्नरी कलावंत,
शिक्षक दत्तात्रयजी एमेकर ,तसेच कोरोना काळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे योगगुरु,संत नामदेव महाराज विद्यालय पानशेवडीचे मुख्याध्यापक नीळकंठजी मोरे ,महात्मा फुले प्राथमिक शाळेचे दिगंबर वाघमारे ,
यांनी म.फुले प्राथमिक शाळा या आपल्या इयत्ता चौथीच्या कु.शिवानी मारोती गीते या विद्यर्थ्यींनींचा आभ्यास घेवून कार्यतत्परतेची साक्ष दिली. कवी व साहित्यिक,नवरंगपुरा जि.प.शाळेचे शिक्षक युसूफ शेख ,
काॅग्रेस पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख,नाईक विद्यालय दिग्रसचे सतिशजी देवकते सर यांचा गौरव केला.
या गौरवाच्या कार्यक्रमा प्रसंगी मारोती मामा गायकवाड यांनी विचार मांडताना गुरुला प्रत्येक व्यक्ती आई वडीलांनंतर शिक्षकांना आदर्श मानतो.पुढच्या वर्षी या पेक्षाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजनाचा मानस बोलून दाखवला.राज कुमार केकाटे यांनी समाजात आपली नोकरी सांभाळत समाजिक कार्यक्रमात हिरीहिरीने भाग घेणारे शिक्षक एक समाजासाठी आदर्श असतात असे गौरवोद्गार काढले. त्याबद्दल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,मामा मित्र मंडळाचे अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांचे शिक्षकांचा गौरव केल्या बद्दल आभार मानले आभार मानले.