कर्तव्य बजावणा-या शिक्षकामुळेच राष्ट्राचा विकास साधल्या जातो — गटशिक्षणाधीकारी रविंद्र सोनटक्के यांचे पुरस्कार वितरण प्रसंगी प्रतिपादन
कंधार ;
शिक्षकाने आपल्या कार्यातसातत्य ठेवून कर्तव्यनिष्ठ भावनेने कार्य केल्यास समाजासह, राष्ट्राचा सहज विकास होतो असे कर्तव्यिभिभूख शिक्षकच गुरुत्वाला पात्र ठरतात.अशा शिक्षकामुळेच मुलांचे भविष्य उज्ज्वल होते. असे प्रतिपादन पंचायत समिती कंधार चे गटशिक्षणाधिकारी मा रवींद्र सोनटक्के यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उस्माननगर बीट उस्माननगर तालुका कंधार येथे आयोजित केलेल्या तर गुरूगौरव पुरस्कार कोरोना काळात या शैक्षणिक उपक्रमातील सहभागी शिक्षकांचा कार्य गौरव सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार पंचायत समितीच्या सभापती सौ लक्ष्मीबाई व्यंकटराव घोरबांड या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर ,सौ. हुडवेकर एस जी, केंद्रप्रमुख शिराढोण, ढोणे सर केंद्रप्रमुख चिखली व जयवंतराव काळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जयवंतराव काळे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी भारताचे राष्ट्रपती सर्पल्ली राधाकृष्णन व ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर उस्माननगर येथे राबविलेल्या कोरोना काळात आँनलाईन मिशन शिष्यवृत्ती 2021 उपक्रमात सहभागी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर अंतर्गत केंद्रातील प्रत्येकी दोन शिक्षकांचा बीट उस्माननगर चे शि वि अ वसंत मेटकर यांच्यावतीने पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र व पुस्तके देऊन बीटस्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यात भगवान ढाले प्रा शा दहिकळंबा, मधुकर कारामुंगे के प्रा शा शिराढोण, रत्नाकर मोरे, सौ विजयमाला बोरसे प्रा शा. औराळ श्रीमती सुशीला आलेवाड प्रा शा उस्माननगर, सौ पल्लवी नरंगले या शिक्षक, शिक्षिकांचा सहभाग होता.
त्या वेळी बोलतांना वसंत मेटकर यांनी आपल्या उपक्रमामागची भूमिका व्यक्त केली,त्यानंतर केंद्रप्रमुख सौ हुडवेकर यांनी प्रत्येक शिक्षक हा परीस असून त्यांच्या ज्ञानस्पर्शाने विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने होते, त्यासाठी शिक्षकाने सदैव कार्यमग्न राहून कार्य करावे अशा भावना व्यक्त केल्या.शेवटी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जयवंत काळे यांनी आभार व्यक्त केले तर सुरेख सूत्रसंचालन साहित्यिक बाबाराव विश्वकर्मा यांनी केले.
या कार्यक्रमाच्या वेळी पूर्ण सोशल डिस्टंसिंगच्या अटींचे पालन करून अगदी मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी दत्ता पा.घोरबांड, आनंदराव पांडागळे, शंकर ढाले, अहमद खान सर, गणेश लोखंडे, भिसे ( पत्रकार)एकनाथ केंद्रे, कैलास पांचाळ, रामेश्वर पांडागळे, सौ नाजुलवाड मॅडम,आलेवाड मॅडम, सौ.कुलकर्णी मँडम यांची उपस्थिती होती