भोकर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.


बारड ; पिराजी गाडेकर
भोकर येथे फिट इंडिया फ्रीडम रन अंतर्गत हा नवीन उपक्रम राबविण्यात आला असून त्या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड तसेच ज्ञानवर्धनि मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बारड संचलित…
क्रीडा प्रशिक्षण केंद्र भोकर, हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता
मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होत असून त्या निमित्त मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय मैदान ते दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर रोड ३ कि.मी. अंतर जाऊन येणे मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला सहभाग नोंदवत पार करत हा उपक्रम यशस्वी रित्या पूर्ण केला आहे.
शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी धावणे व चालणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे त्यास नेहमी तंदुरुस्त (फिट) राहण्याची आवश्यकता आहे त्याच उद्देशाने
दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी भोकर येथे हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सनीटायझर मास्क आणि सामाजिक अंतर पाळून यात सर्व वयातील स्पर्धक मोठ्या सहभागी झाले होते.
यावेळी कार्यक्रमाची सांगता मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून संपन्न करण्यात आला
या कार्यक्रमाचे अायोजन क्रीडा प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच बालाजी एल.गाडेकर यांनी केला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एस. कुमरे यांनी केले
या प्रसंगी आरोग्य विषयी क्रीडा क्षेत्राचे महत्व सांगण्यात आले
झालेल्या कार्यक्रमाची सार्वत्रिक कौतुक केले जात आहे व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, भोकर तालुका क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी गुरुदीप सिंधू, क्रीडा अधिकारी अनिल बंदेल यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *