( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)
पेठवडज येथील गावात दिनांक 7.9.2023 रोजी ग्रा.पेटवडज येथील समोर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलनास स्थगिती दिल्यानंतर मा.श्री.मनोज जरांगे पा. यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाला पाठिंबा म्हणून पेटवडज येथे दि.7.9.2023 रोजी पासून उपोषणाला बसल्यानंतर मा.श्री. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर दिनांक 14.9.2023 पासून पेटवडज येथील साखळी उपोषणाला बसलेल्या उपोषण कर्त यांनी आज दि.23.09.2023 पासून आज कडकडीत आंदोलन (उपोषण) करण्यात येत आहे यावेळी उपोषण कर्त मा.श्री.पंढरीनाथ एकनाथ दामले (नां जि.मध्यवर्ती बँक सोसायटी सदस्य पेटवडज) व तसेच मा.श्री.व्यंकटरावजी तुकाराम पांढरे (नां.जि.मध्यवर्ती बँक सोसायटी चेअरमन पेठवडज) व मा.श्री.पांडुरंग व्यंकटरावजी कंधारे साहेब(नां.जि.मध्यवर्ती बँक सोसायटी पेटवडज माजी चेअरमन पेटवडज तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य व ग्रामरक्षकदल अध्यक्ष) तसेच मा.श्री.एकनाथ उर्फ नामदेव पा.डावकोरे (ग्रा.पं.सदस्य) व मा.श्री.शंकर हरी आष्टूरे (सामाजिक कार्यकर्ते) व श्री.विलास पंढरीनाथ दामले व श्री.ज्ञानेश्वर डावकोरे व श्री. रमेश पांढरे व सर्व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी उपोषण करते माननीय श्री पंढरीनाथ एकनाथ दामले नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटी पेठवडज सदस्य व तसेच मा.श्री. शंकर हरी आष्टूरे यांनी उपोषणाच्या साखळी उपोषणाच्या दहाव्या दिवशी कडकडीत उपोषण करण्यात येत असल्याचे सांगितले.व सकल कुणबी मराठा एक मराठा लाख मराठा जोपर्यंत कुणबी मराठा आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आमचे साखळी उपोषण सुरुवात राहील व जोपर्यंत कुणबी मराठा आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आमचे साकळी उपोषण निरंतर चालू असेल असे सांगितले