कंधार :(दिगांबर वाघमारे )
कंधार मधील येईलवाड परिवाराने आपल्या तिन्ही सुनांना मखरामध्ये पारंपरिक पद्धतीने बसवत त्यांचे पूजन केले. सलग तिसऱ्या वर्षीही अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करीत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडी तथा माजी जि. प.सदस्य रामचंद्र येईलवाड येईलवाड कुटुंबाचे हे तिसरे वर्ष आहे. मोठ्या उत्साहात चालत्या बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सूनच असते, असा संदेश समाजाला दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंधश्रद्धेला फाटा मारून माजी जि. प. सदस्य रामचंद्र येईलवाड लाकडाच्या लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन न करता स्वतःच्या सुनेला लक्ष्मी म्हणून पूजन केले आहे. त्यामुळे आदर्श घेण्याची वेळ आली आहे. याविषयी येईलवाड यांना विचारले असता आतापर्यंत माझ्या वडिलांनी, आईंनी, लाकडाची लक्ष्मीपूजन केले नाही परंतु स्वतःच्या सुनेला लक्ष्मी म्हणून पूजन केले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन मी व माझी पत्नी सुनेला लक्ष्मी मानत त्यांची पूजा करीत आहोत.
महाराष्ट्रभर लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. परंतु लाकडाच्या लक्ष्मीचे पूजन करण्या ऐवजी घरातील लक्ष्मीचे पूजन करावे आणि त्यांचा आदर्श घ्यावा व इतरांना लक्ष्मीचा संदेश द्यावा तसेच अंधश्रद्धा बाजूला ठेवावी असे ही प्रतिपादन माझी जी प सदस्य येईलवाड यांनी केले
* आपल्या मुलीला जसे प्रेम दिले तसेच सुनेला प्रेम दिले तर सूनही मुलगी होऊ शकते. मुलीचे लग्न झाले की, ती दुसऱ्या घरची सून होते. सून हीच खरी लक्ष्मी आहे. कमलबाई येईलवाड यांनी सांगितले.
* ज्या दिवशी माझ्या घरात दोन सुना आल्या तेव्हापासून मी हा उपक्रम सुरू केला आहे. सूना ह्याचं आपल्या चालत्या बोलत्या खऱ्या लक्ष्मी आहेत. आपला वंश वाढवणाऱ्या आहेत. याच लक्ष्मीचा हात घरात फिरला तर घरात लक्ष्मी येते. – रामचंद्र येईलवाड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडी.