मुखेड:
छत्रपती गणेश मंडळ दीपनगर, मुखेड तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्स्फूर्त ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झाले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रशांत खंडागळे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली मोरे, जिजाई ब्लड बँकेचे गंगाधर पवार, माजी मुख्याध्यापक आर.बी. जाधव, पि.बि.चल्लावार, प्रा. गोविंद नारखेडे , व्हि.व्हि मेनकुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाच्या उन्नती साठी युवकाचे योगदान खुप महत्वाचे आहे म्हणून छत्रपती गणेश मंडळाचे सदस्य हे समाजकार्य करत आहे याचे खुप समाधान वाटते आहे आसे गौरवोद्गार कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी केले .अध्यक्षीय समारोपात सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत खंडगळे यानी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तसंकलन करण्यासाठी नांदेड येथील जिजाई ब्लड बँक व त्यांचे कर्मचारी व छत्रपती गणेश मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष दयानंद क्षेत्री, सचिव राजू गडमवाड, मार्गदर्शक आकाश दरेगावे, सचिन मेनकुदळे, संतोष तळेगावेसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक संतोष तळेगावे यांनी केले.
यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.