कंधार ; प्रतिनिधी
शासनाच्यावतीने देण्यात येणारा आनंदाचा शिधा गणेश स्थापना ते गौरी गणपती या दरम्यान सर्वसामान्य जनतेला शासनाच्या वतीने वाटप करण्यात येत असून ४२ हजार २०५ कार्ड लाभधारकांना देणार असल्याची माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांनी दिली.
कंधार तालुक्यात अंतोदय, शेतकरी, प्राधान्य या तीन योजनेतील ४२ हजार २०५ कार्ड -लाभधारक आहेत. या तिन्ही योजनेतील लाभधारकांना गणेश स्थापना ते गौरी गणपती या काळात शासनाच्यावतीने आनंदाचा शिधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार ७० टक्के लाभधारकांना आनंदाची किट देण्यात आल्याची माहिती नायब तहसिलदार कामठेकर यांनी दिली.
तालुक्यातील लाभधारकांना देण्यात येणाऱ्या आनंदाच्या किटमध्ये १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर, १ किलो तेल पॉकेट आदी १०० रुपयांत लाभधारकांना वाटप करण्यात येत आहेत.
कार्डधारकांनी आपापल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून आनंदाची किट घेऊन जावे, असे आवाहन पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांनी केले आहे.