ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आयुष्यमान भव: मेळावा सपन्न ;जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले मागदर्शन

 

कंधार ; प्रतिनिधी

आज दि:-२३ सप्टेंबर २०२३ रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजू टोम्पे तसेच उदघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते ठिक ११:०० वा वैद्यकीय क्षेत्रातील दन्वंतरी देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आयुष्यमान भव: मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक बोलतांना म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,आरोग्य वर्धनी केंद्र येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आज आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील विविध विषयाचे तद्द डॉक्टर उपलब्ध झाले आहेत यांचा जास्तीजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा .

यानंतर सुद्धा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दर शनिवारी १८ वर्षे व त्यावरील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मा.निळकंठ भोसीकर यांनी दिली.तसेच कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजू टोम्पे यांनी कंधार शहर व परिसरातील नागरकांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.

यानंतर शिबिरामध्ये विविध तज्ञांच्या मार्फत एकूण ८१२ रुग्णाची तपासणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *