ईद – ए – मिलाद निमित्ताने माहितीवर आधारित आकाशवाणी नांदेडवर आज कार्यक्रम

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) ईद – ए – मिलाद निमित्ताने माहितीवर आधारित समन्वित कार्यक्रम , ‘मिलाद – उन – नबी दिन विशेष ‘ हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन आज दि २८ सप्टें २३ रोजी सकाळी ०८ : ४० मिनीटांनी प्रसारित होणार आहे.
या विशेष समन्वित कार्यक्रमाच्या लेखिका आणि वाचक प्रा डॉ तस्निम पटेल मँडम आहेत तर सादरकर्ते राहुल आत्राम सर आहेत. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती आहे. FM band १०१.१ MHz वर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *