‘ माझे बाबा ‘ आज नसलात जरी तुम्ही आमच्यामध्ये,
तरी तुम्ही नेहमी राहणार आमच्या मनामध्ये.
लोक म्हणत असे ऊसाच्या पोटीम काऊस जन्माला,
परंतु सर्व गुणांनी परिपूर्ण होऊन चुकीचे ठरवले तुम्ही त्यांला.
बहिण भावंडांचा सांभाळ केलात तुम्ही आईप्रमाणे छान,
ते पुत्र होते रामरावांचे महान.
तुम्हाला खाण्यास आवडायचे नवनवीन पदार्थ,
मनाला दिलासा देतोत आम्ही आहेत तुमच्या मागे स्वामी समर्थ.
बाबा तुमचे मित्र तुमच्याशी वडील भावासारखे वागायचे,
तुम्ही हात उचलला तरी तुम्हाला फिरून नाही बोलायचे.
खपट आणि चिंधी पासून बनवण्यास शिकवलात चांदणी,
बाबा आठवण येते तुमची प्रत्येक क्षणी.
विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्यास प्रथम पाऊल उचलला तुम्ही,
तुमच्याप्रमाणेच नियमित सेवा करणार त्यांची आम्ही.
तुम्ही लहानपणापासूनच झालात कलाकार व नाटककार,
आज गावात आहे तुमच्या नावाचा जय जय कार.
पंथाची सुन या नाटकात मिळाला तुम्हाला पुरस्कार,
तिथूनच भेटला तुमच्या जीवनाला आकार.
बाबा तुमची आई होती सत्यवान,
आज गावात आहे तुमचा नेहमीप्रमाणे मान.
मनामध्ये जिद्द ठेवून बनलात तुम्ही सोनार,
तेव्हापासुनच बनवण्यास सुरूवात केली डिझाईनचे हार.
प्रत्येक गोष्ट सांगत होतात तुम्ही आम्हाला समजावून,
जग मिळवल्यासारखे वाटत होते तुम्हाला पाहून.
बाबा रागीट होता तुमचा स्वभाव,
परंतु तुम्ही कधीच केला नाही आम्हा बहिण भावंडांमध्ये दुजाभाव.
तुम्ही होतात कुशल पंचांगामध्ये,
हरवलेली वस्तू विचारली की यायची तुमच्या मनामध्ये.
तुमच्यावरी लिहीताना शब्द अपुरे पडले,
नभाला हात लावण्याचे स्वप्न तुम्ही आमच्या मनी लावले.
बाबा आकाशात पाहताच आठवण येते तुमची,
तुम्ही केलेली गोष्ट पाहताच मनं रमवून जातात आमची.
लिहायचे होते आणखीनं काही,
आदर ठेवणार तुमचा मी नेहमी.
सौ ज्ञानाबाई काशिनाथराव पोतदार – पांचाळ
फुलवळ ता कंधार