कंधार (प्रतिनिधी संतोष कांबळे )
महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल या रस्त्याचे काम १०० फुटांचे व्हावे यासाठी मातंग समाज व माजी सैनिक संघटनेच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात होते.या आंदोलनाची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधारच्या वतीने दखल अतिक्रमण धारकांना २१ सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना लेखी देण्यात आल्या होत्या.
परंतू या सूचनांवर कसलीही कार्यवाही झाली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हे अतिक्रमणधारकांना छुप्या पद्धतीने पाठिंबा देत आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देवून ही अधिकारी हे वेळकाढूपणा करत असल्याने दि.२७ सप्टेंबर पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधारच्या समोर मामा गायकवाड यांच्यासह सकल मातंग समाजाच्या वतीने आमरण उपोषणास बसले आहेत.
कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल या रस्त्याचे काम १०० फुटांचे व्हावे यासाठी माजी सैनिक संघटना, मामा गायकवाड व सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलने व रास्तारोकोच्य माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधारने घेवून आंदोलकांच्या मागणीनुसार रस्त्याच्या मध्य भागापासून ५० फुट अंतरावर नाली मारण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.यावर बांधकाम उपविभागाने अतिक्रमण धारकांना २१ सप्टेंबर पर्यंत आपले अतिक्रमणात काढून घेणं
याच.याच्या लेखी सूचनाही दिल्या होत्या.यातील छोट्या व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण काढून घेतले असले तरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या जागेतील असलेले नगरपरिषदचे शॉपिंग सेंटर मधील आपली दुकाने काढण्यास तयार नाहीत.सदर व्यापारी स्वतः ची दूकाने वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधीसमोर लोटांगण घेत आहेत.या शॉपिंग सेंटर मध्ये राजकीय लोकांची दुकाने असल्याने लोकप्रतिनिधीही अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची जनतेत चर्चा सुरू झाली आहे.सकल मातंग समाज व मामा गायकवाड व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी वारंवार वरिष्ठ अधिकारी या़च्याशी चर्चा करुनही सार्वजनिक बांधकाम उपविभागाडून बांधकाम पाडण्यास टाळाटाळ होत असल्याने दि.२७ सप्टेंबर रोजी पासून मामा गायकवाड व सकल मातंग समाजाच्या वतीने तात्काळ अतिक्रमण पाडून १०० फुटांचा रस्ता झाला पाहिजे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत.
१८ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम उपविभाच्या वयाने दखल घेवून आमच्या हद्दीतील १०० फुटाच्या जागेवर आम्ही ताबा घेवून दोन्ही नाली मारण्याचे लेखी आश्वासन दिले होते.परंतू या दिलेल्या आश्वसनावर कोणत्या लोकप्रतिनिधीचा गद्दा आला असल्याने अधिकारी संबंधित व्यापाऱ्यांना छूप्या पध्दतीने पाठींबा देत आहेत.संबधित व्यापाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्य सोबत बैठक झाल्याची चर्चा कंधार मध्ये रंगली होती.परंतू या बैठकीतून जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव किंवा ठेवा याबाबत कसलाही आदेश दिल्याचे समोर आले नाही.असे असतांनाही सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकार अतिक्रमण पाडण्यासाठी का टाळाटाळ करत आहेत असा संतप्त जनतेकडून केला जात आहे.
या आमरण उपोषणस्थळी बालाजी कांबळे,महेश मोरे,विद्यासागर वाघमारे, पद्माकर बसवंते,कैलास कांबळे,राजु मळगे, निरंजन वाघमारे,बन्टी गायकवाड, कैलास नवघरे, सुनील बिजले,शरद फुले,मनोज कांबळे, प्रणाम टोम्पे,मुन्ना बसवंते, कांचन कुमार गुंडेकर,महेश कांबळे,उद्धव वाघमारे, विठ्ठल कांबळे,व्यंकट कांबळे,मोनित गायकवाड,रेणूकादास भिसे,प्रणव टोम्पे आदींची उपस्थिती होती.
चौकट…..
जोपर्यंत अतिक्रमण पाडणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही
कंधार शहरातील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊसाठे यांचा पुतळा दर्शनीय भागात यावा.तसेच कंधार शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता फुटांचा होणे अत्यंत महत्वाचे आहे.या रस्त्यावरील जोपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येणार नाही तोपर्यंत तोपर्यंत मी माझे आमरण उपोषणातून माघार घेणार नाही.माझा जीव गेला तरी चालेल.
मामा गायकवाड
सदर रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत बांधण्यात आलेले नगरपरिषदचे शॉपिंग सेंटर हे सार्वजनिक बांधकाम विभागाची कसलीही परवानगी नघेता बांधण्यात आलेले आहेत.सदरील रस्ता हा १०० फुटाचाच आहे.परंतू येथील राजकीय नेत्यांमुळे शहर शहराच ऐ वाटोळे झाले आहे.येथील काही स्थानिक पुढाऱ्यांनी शहरातील काही भागात अतिक्रमण करुन जमीन बळकावल्या आहेत.रंतू महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता अतिक्रमण हटवून १०० फुटांवर दोन्ही बाजूंनी नाली मारल्याशिवाय मी शांत बसणार बसणार नाही.वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.
बालाजी चुकलवाड
जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटना नांदेड