कंधार ; प्रतिनिधी
महाराणा प्रताप ते जाधव हॉस्पीटल पर्यंतचा रस्ता मंजूर झालेला असून तो अतिक्रमणात अडकला आहे .अतिक्रमण हटवून 100 फुटाचाच रस्ता करण्यांत यावा अन्यथा कार्यालयीन वेळेत माजी सैनिक वि.स. संघटनेच्या वतीने 3 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असा इशारा आज दि . २८ रोजी निवेदनाद्वार सार्वजनिक बांधकाम विभाग कंधार यांना दिला .
आपल्या कार्यालयाकडून सदरील रस्ता हा अतिक्रमण हटवून 100 फुटाचाच रस्ता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन आपल्याकडून पुर्ण झाले नाही. म्हणून मातंग समाजाच्या वतीने मामा गायकवाड यांच्या नेतत्वाखाली रस्ता रोखो अंदोलन करण्यांत आले परत आपल्या कार्यालयाने दखल घेवून तत्वरीत हा रस्ता अतिक्रमण हटवून 100 फुटाचाच करण्यात येईल.
म्हणून लेखी आश्वासन दिले पण आपल्या कडून दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.
आपल्या कार्यालयाने लेखी आश्वासने देवून सुध्दा फसवा फसवीचे आम्हाला उत्तरे मिळत आहेत. म्हणून मातंग समाजाच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या समोर मारोती मामा गायकवाड हे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत.
तसेच आपल्याकडून आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे माजी सैनिक वि.स. संघटनेच्या वतीने दिनांक (03.10.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आपल्या दालनामध्ये उपोषणास बसणार असल्याचे माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष
बालाजी रामप्रसाद चुकलवाड यांनी कार्यकारी अभियंता , सा.बा. कंधार यांना दिला .