स्वच्छतेसह श्रमदान’ उपक्रम रविवारी नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

 

परभणी  : राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून, रविवार, (दि. १) रोजी सकाळी १० वाजेपासून ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

देशात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी जन सहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *