कंधार/मो सिकंदर
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत चा शंभर फुटाचा रस्ता मंजूर झाला असल्याने याच मार्गावर अण्णा भाऊ साठे शॉपिंग सेंटर आड येत असल्याने ते शॉपिंग सेंटर मधील दुकानदारांना तिन दिवसात दुकाने रिकामी करण्याची नोटीस बांधकाम विभागाच्या वतीने बजावण्यात आली आहे.
तर आण्णा भाऊ साठे पुतळा दर्शनीय भागात यावा व परिसर सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी शॉपिंग सेंटर पाडा असे सकल मातंग समाज व माजी सैनिक संघटना यांनी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
हा वाद चालू असतानाच जागा मालकी हक्क दर्गाह शेख अली ऊर्फ सांगडे सुलतान मुश्किलेआसान यांच्या वतीने मालकी हक्काचे मोठ मोठे फलक लावण्यात आले असल्याने या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली असल्याने ” उस माळ्याचे , भांडण कोल्ह्याचे ” अशी जोरदार चर्चा शहरात होतांना ऐकावयास मिळत आहे.
अण्णा भाऊ साठे शॉपिंग सेंटर सर्वे क्रं.7/2 मध्ये १९९३-९४ मध्ये उभारण्यात आले आहे तेंव्हा पासून आजपर्यंत कंधार नगरपरिषद या दुकानदारांकडून भाडे वसूल करत असले तरी.सर्वे नं.७/२ (६ हेक्टर ४५ आर) कंधार हि दर्गाह हजरत सय्यद अली मुश्किल-ए-आसान सांगडे सुलतान(रहे.) यांच्या प्रशासनाखालील वक्फ मालमत्ता मालक व कब्जेदार आहे, तरी सदर वक्फ जागेवरील अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
असे सय्यद शाह अन्वारुल्ला हुसैनी पि.सय्यद शहा नुरउल्ला हुसैनी, दर्ग्याचे सज्जादा नशीन व मुतवल्ली यांच्या आदेशान्वये अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. ही जागा दर्गाह मालकीचे फलक लावण्यात आल्याने ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची असा प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने ” उस माळ्याचे , भांडण कोल्ह्याचे ” अश्या नवीन चर्चेला उधाण आले आहे.