कौठा | प्रतिनिधी ( प्रभाकर पांडे )
कंधार तालुक्यातील मौजे कवठा येथील अमरपदवासी द.भ.प. दिगंबरराव गोविंदराव कवठेकर गुरुजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा कंधार विधानसभाचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे असून उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते विक्रांत शिंदे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे यांच्या उपस्थितीत तज्ञ डॉक्टरांचे रोगनिदान शिबिर संपन्न होणार आहे. द.भ.प. मैनाताई हिप्परनाळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे.
महंत
श्री १००८ दत्त संस्थान कोलंबी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी ठीक नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान प्रताप देशमुख सेवा सोसायटी चेअरमन यांनी केले आहे.