दोन दिवसात कंधार येथिल अतिक्रमणावर जेसीबी लावणार व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार शामसुंदर शिंदे यांचे आश्वासन ..! उपोषणकर्ते मारोती मामा गायकवाड यांना दवाखान्यात हलवले

 

कंधार | दिगांबर वाघमारे 

 

शहरातील महाराणा प्रताप चौक ते डॉक्टर जाधव हॉस्पिटल पर्यंतचा १०० फुटाचा रस्ता करण्यात यावा व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मागे असणारा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावा या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या अमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून उपोषणकर्ते मारोती मामा गायकवाड यांचे प्रकृती गंभीर झाली आहे या उपोषणाची दखल घेऊन कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आज भेट दिली दोन दिवसात मागण्या मान्य करून दोन दिवसात कंधार येथिल अतिक्रमणावर जेसीबी लावणार व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन आमदार शामसुंदर शिंदे यांनी दिले . उपोषणकर्ते मामा गायकवाड यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे .

 

कंधार येथिल मुख्य रस्त्यावर चालू असलेले मारोती मामा गायकवाड व त्यांच्या समाजाच्या वतीने सुरू असलेले उपोषण आता व्यापक झाले आहे . या उपोषणाला सकल मातंग समाज व विविध सामाजिक संघटना , माजी सैनिक संघटना यांनी जाहीरपणे पाठिंबा देऊन महाराणा प्रताप चौक ते डॉक्टर जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता शंभर फुटाचा व्हावा असे समर्थन करून अनधिकृत बांधकाम पाडावे व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मागे असणारा दर्शनी भागात यावा यासाठी समर्थन केले आहे .

त्यातच ३ ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन , साखळी उपोषण व मोर्चा सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे . दरम्यान उपोषणकर्ते यांचा उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे हे समजतात कंधार लोहा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन दोन दिवसात अनाधिकृत बांधकामावर जेसीबी लावण्याचे आश्वासन दिले व तात्काळ मारोती मामा गायकवाड यांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात हालवण्यात आले आहे .

खरोखरच आमदार शामसुंदर शिंदे दोन दिवसात कार्यवाही करतील का ? वेळ काढूपणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *