मुखेड-विद्यार्थ्यांनी ज्ञानाला अत्याधिक महत्त्व द्यावे.ज्ञान मिळविण्यासाठी वर्गात उपस्थित राहून प्राध्यापकांच्या वर्गांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. ज्या उद्देशाने राठोड बंधूंनी हे महाविद्यालय उघडले आहे तो उद्देश सफल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.
महाविद्यालयातील विविध योजनांचा तथा उपक्रमांचा फायदा घ्या. अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवून महाविद्यालयातील क्रीडाक्षेत्र,राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग यात सक्रिय सहभाग नोंदवा.गणवेश व ओळखपत्र सतत वापरत चला.
विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त बाळगावी असे प्रतिपादन ग्रामीण (कला, वाणिज्य विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर येथील प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांनी प्रस्तुत महाविद्यालयात नियोजन विभागाकडून विद्यार्थी उद्बोधन कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.डाॅ. रामकृष्ण बदने म्हणाले की विद्यार्थी या शब्दाचा अर्थ आहे जाणीव प्राप्त करणे.ती जाणीव आपणास आपल्या आई-वडिलांच्या गरीबीची,अडचणींची असली पाहिजे. अज्ञान व अविवेक सोडून ज्ञान प्राप्त करणे व विवेकी राहणे ही जाणीव ही असली पाहिजे. जगातील मोठी माणसे ही जाणीव प्राप्त झाल्यामुळेच मोठी झाली आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे.
दुसरे प्रमुख पाहुणे आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.बळीराम राठोड म्हणाले की कष्ट कराल तर फायदा होईल.कोणती ही शाखा निवडा पण त्यात मन ओतून अभ्यास करा.काळाची पावले ओळखून कार्य करा.महाविद्यालयात नियमीत उपस्थित रहा.
महाविद्यालयात नेहमीच उपस्थित राहिलात तर जीवनात निश्चितच बदल झाल्याशिवाय राहणार नाही.
नॅक समन्वयक प्रा.डाॅ.उमाकांत पदमवार म्हणाले की तुम्ही महाविद्यालयात नियमित राहण्यासाठीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे तेंव्हा नियमीत उपस्थित रहा.
हे महाविद्यालय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर कार्य करते. महाविद्यालयात आम्ही घेत असलेल्या परीक्षांना हजर राहत चला. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत चला. चालढकल केली तर यश प्राप्त होणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन समितीचे प्रमुख प्रा.डाॅ. देविदास केंद्रे यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रंथपाल डॉ.सुग्रीव क्षिरसागर यांनी केले तर आभार प्रा.श्रीकांत जेवळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.प्रदिप कोटुरवार यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.