कंधार | प्रतिनिधी
काशीराम तांडा येथील नागरिकास स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी निधी मंजूर करून घेतला होता. या योजनेतून जल शुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले असून ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.संजय पवार यांच्या हस्ते आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची उपस्थिती होती.ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे माजी पंचायत समिती उत्तम चव्हाण यांनी विविध गावच्या विकास कामासाठी विकास निधीची मागणी केली होती.
प्राप्त झालेल्या निधीतून पाणीपुरवठा व जल जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असून. श्री गणेश विसर्जनाच्या रोजी. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पवार यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक दंडगव्हाळ, बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष सुंदरसिंग जाधव, संगमवाडी चे सरपंच प्रतिनिधी चक्रधर घुगे, ग्रामसेवक श्रीधर विश्वासराव माजी सरपंच ज्ञानोबा घुगे, माजी उपसरपंच परमेश्वर घुगे, वाहन क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष माधवराव कांबळे, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक नामदेवराव चव्हाण, काशीराम तांडाचे नाईक शिवाजीराव चव्हाण, नामदेव राठोड, यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
जल शुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरानी गावकऱ्यास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी चव्हाण यांनी केले व मान्यवराचे आभार माधव चव्हाण यांनी मांडले.