सकाळी १० ते ११ यावळेत महाश्रमदान उपक्रमात संस्थात्मक कार्यालय, पर्यटन स्थळ, वारसा स्थळ, धार्मिक स्थळ, बाजारपेठ, बसस्थानक, पाणी स्रोतांचा परिसर, जुने अनेक दिवसांपासून कचरा असलेली ठिकाणे, सार्वजनिक व ईत्यादी ठिकाणाची स्वच्छता करणे.
प्रत्येक गावासाठी संपूर्ण अधिकारी नेमावा.
सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय, सन्माननीय सरपंच, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदचे माजी पदाधिकारी, सदस्य यांना निमंत्रित करावे.
श्रमदानातून अंदाजे किती कचरा संकलित झाला, याची नोंद ठेवावी. यात प्लास्टिक कचऱ्याची वेगळी नोंद ठेवावी.
श्रमदान उपक्रमाचा केवळ एकच फोटो अपलोड करायचा आहे. त्यामुळे गावनिहाय फोटो नोडल अधिकाऱ्यांनी संकलित करुन BRC यांना पाठवावे. या सोबत श्रमदानात सहभागी संख्या द्यावी.
सकाळी 11 ते 4 या वेळेत फोटो अपलोड करावयाचे आहेत. त्यामुळे BRC/CRC यांच्यासोबत समन्वयक ठेवून फोटो अपलोड करावेत.
आज केंद्रीय शिक्षण सचिव श्री संजय कुमार सर यांनी सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली.
मा पंतप्रधान महोदय यांनी मागील मन की बात कार्यक्रमांमध्ये एक तास देशासाठी याबाबत उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सर्व शाळांमधून एक तास श्रमदानाद्वारे स्वच्छता असा कार्यक्रम 2 ऑक्टोबर च्या महात्मा गांधी जयंतीच्या अनुषंगाने घ्यावयाचा आहे.
त्या दृष्टीने सर्वांनी तयारी करावी व या उपक्रमाचे फोटोग्राफ व्हिडिओज वगैरे मागील वेळेप्रमाणे ग्रुप वर अपलोड करावेत
श्री पानझडे यांनी समन्वय करावा.
[ प्रति,
सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व,
प्रशासन अधिकारी मनपा सर्व
विषय : शाळांमध्ये दि. 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम राबविणेबाबत ….
शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केलेनुसार दि 15.9.2023-2.10.2023 या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम प्रत्येक वाडी/ वस्ती/ गाव/ शहर यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक शाळेमध्ये शालेय परिसर/ शाळे जवळील परिसर/ ग्रामपंचायत स्तरावर विविध भागामध्ये सामूहिक स्वच्छता करणेसाठी ” एक तास श्रमदान” कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रम आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत आपण सूचित करावे. याबाबत आपल्या अधिनस्त गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना या उपक्रमात सहभागी होणेबाबत सूचित करावे.
सदर उपक्रम हा साधारणपणे सकाळी 8-12 या वेळेत राबविण्यात यावा.
सदर कार्यक्रमाचे फोटो https://swachhatahiseva.com/ या ट्रॅकर वर दि 01.101.2023 या दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अपलोड करावे.
प्रदीप डांगे, (भा प्र से )
राज्य प्रकल्प संचालक,
समग्र शिक्षा,
महाराष्ट्र.