प्रेम नक्की काय असतं
रोजच त्याला आणि तिला एका ठरलेल्या वेळी फोनवर बोलायची सवय असते पण काल काही कारणाने त्यांना एकमेकांशी बोलता येणार नव्हतं तसा तिने त्याला मेसेज केला त्यावर त्याचा आलेला मेसेज वाचुन ती अजूनच त्याच्या प्रेमात पडली तो मेसेज असा होता ” Lets enjoy those moment आणि हुरहूर …How Romantic na असं तिच्या तोंडुन निघुन गेलं… तुम्ही म्हणाल यात काय रोमॅन्टिक आहे .. जो प्रेमात असतो आणि जी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत रोमान्स पहाते तीच प्रेमाकडे अशा सुंदर नजरेने पाहु शकते..
जेव्हा तो तिला मिठीत घेतो आणि म्हणतो , गोडुली तुझ्या मिठीत काय जादु आहे माहीत नाही पण असं वाटतं हाच आयुष्याचा शेवट असावा..यापुढे काहीच नसावं नको पैसा , नको फेम.. फक्त मिठीतील मिठास आणि बाहेर जोरात पाऊस असेल तर अजूनच cherry on Top..पावसात इकडेतिकडे फिरताना दोघांकडे दोन छत्र्या असतात तरीही तो तिला म्हणतो ,तुझी छत्री बंद कर आणि तिला स्वतःच्या छ्त्रीत घेतो…तिच्या खांद्यावर हात ठेवुन तिला जवळ घेत म्हणतो , लोक आपल्याकडे पहातायत बघ त्यांना हेवा वाटत असेल ना आपल्या प्रेमाचा.. त्यावर ती लडीवाळपणे म्हणते , ज्यांना प्रेम कळणार नाही ते म्हणतील दोन छत्र्या असताना हे भिजत एका छत्रीत का बरं जात असतील.. त्यावेळी त्या दोघांचे मनसोक्त हसणे असेल किवा तिच्या उरोजांचा त्याच्या हाताला झालेला स्पर्श असेल त्यावेळी तिचं मोहरणं आणि दोघांची झालेली नजरानजर ..
अहाहा मर जावा.
दोघांनी दोन ग्लासात वेगवेगळी सरबतं प्यायला घ्यायची आणि मधेच त्या ग्लासची अदलाबदल असेल किवा अर्ध्या ग्लासानंतर उरलेले सरबत एकाच ग्लासातुन पिणं असेल आणि त्यावेळी त्यांची देहबोली पाहुन ७० च्या काकानाही त्यांचे कॉलेजचे दिवस आठवणे असेल किती सुखद ना.. अगदी त्या पहिल्या पावसाच्या मृत्तिकागंधासारखे.. अविरत आणि अखंडीत..
चड्डीत रहाताना कायमच प्रेमात रहा..
रस्त्याने दोघे जात असताना तिला एक सुंदर ड्रेस दिसतो..किती सुंदर रंग आहे ना असं ती सहज म्हणते त्यावर तो विचारतो , चल घ्यायचा का ??तिला माहीत आहे , त्याचा बिझनेस आता स्लो सुरु आहे त्यावेळेस तिचं त्याला नको म्हणणं असेल त्याच्या आर्थिक बाजुचा विचार करुन वागणं असेल हेच तर प्रेम आहे ना..त्याच्याकडे असलेल्या पैशात त्याला त्याच्या प्रेयसीला काहीतरी देउ वाटतय ही खूपच मोठी मौल्यवान गोष्ट आहे हेच तर प्रेम ना..
गुलाब घेउ का गं ??.. असं त्याचं बोलणं आणि त्यावर ती खट्याळपणे म्हणते , गुढघ्यावर बसुन देणार असलास तर दे , प्रत्येक गोष्टीचा सोहळा व्हायला हवा नारे असं जेव्हा तिचं वाक्य येतं तेव्हा तो म्हणतो तुझ्यामुळे मी अजूनच तरुण होतोय गं.. छोट्या छोट्या गोष्टीकडे नव्याने पहाण्याची ताकद गोडुली तुझ्यामुळे मिळाली .. किती सुंदर आहे ना सगळं.. तुम्ही विचार करताय ना हे सगळं खरच घडत असेल का ??.. नक्कीच असेल का नाही..
जिथे दोन रोमॅन्टिक व्यक्ती एकत्र येतात तिथे हे फक्त असच घडु शकतं.. जिथे वासनेला जागा नाही .. आहे फक्त आणि फक्त निखळ सुख..
सोनल गोडबोले