पेठवडज येथील गावातील श्री गणेशाचे शांततेत विसर्जन….

( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)

 पेठवडज ता.कंधार येथील गावात श्री.छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश मूर्ती चे दि.28.9.2023 रोजी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झालेला असून सर्व कार्यक्रम संपन्न व्यवस्थित पार पाडण्यात आला यावेळी मा.श्री. लखन लक्ष्मण बकवाड गणेश मंडळाचे अध्यक्ष व तसेच मा.श्री. प्रशांत रावजी पुटवाड व तसेच या गणपती उत्सवानिमित्त विसर्जनानिमित्त मा.श्री.अतुल रावजी किनवाड सर यांनी या ठिकाणी भजनी मंडळांना रंग रोगोटी करून व्यवस्थित रित्या कार्यक्रम पार पाडून विसर्जन करण्यात आले यावेळी सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

व तसेच या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमात श्री.महर्षी वाल्मिक गणेश मंडळ पेठवडज यांच्या सर्व समाज बांधवांनी गणपती विसर्जन करण्यामध्ये सहकार्य केलेले असून यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवून या गणेश मंडळाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व सर्व सदस्य व सचिव यांनी व सर्व समाज बांधव उपस्थित होते व शांततेत त विसर्जन करण्यात आले.

तसेच इंदिरानगर येथील गणेश मंडळी पण शांततेमध्ये गणपती विसर्जन करून माननीय अध्यक्ष महोदय व सर्व सदस्य व सचिव व सर्व समाज बांधवांनी सहकार्य करून गणेश मंडळाचे विसर्जन करण्यात आले.

तसेच भवानीनगर येथील गणेश मंडळांनी व सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व कार्यकर्ते व समाज बांधव यांनी गणपतीचे विसर्जन व्यवस्थित शांततेतरित्या कार्यक्रम पार पडला.

तसेच भोले नगर येथील गणेश मंडळांनी गणपतीचे विसर्जन व्यवस्थित रित्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्यांनी व सर्व समाज बांधवांनी गणपतीचे विसर्जन व्यवस्थित रित्या पार पाडले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

तसेच चौकातील गणेश मंडळांनी पण विसर्जनांचा व्यवस्थित कार्यक्रम माननीय अध्यक्ष व उपाध्यक्ष व सचिव व सर्व सदस्य व समाज बांधव व सर्व त्यांचे कार्यकर्ते यांनी व्यवस्थित ते त्या कार्यक्रम पार पाडला.

तसेच सर्व गावातील परवानाधारक गणेश मंडळ यांनी सर्व गणेश मूर्ती अनंत चतुर्थी या निमित्ताने गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडलेला असून यावेळी सर्व गावातील महिला व जनसमुदाय व जनता व सर्व नागरिक व प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी सर्व या विसर्जनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती व तसेच यावेळी पोलीस विभागाचे कर्मचारी मा.श्री. इंद्राळे साहेब पोलीस उपनिरीक्षक कंधार व तसेच व्यवहारे बीट जमादार साहेब, व श्री.तुकाराम जुने साहेब व तसेच त्यांचा सर्व स्टाफ कर्मचारी व या गावातील पोलीस पाटील व सर्व पत्रकार परिषद व तंटामुक्ती अध्यक्ष सर्वांनी या ठिकाणी गणेश विसर्जन निमित्ताने सहकार्य केलेले आहे व संरक्षण दिलेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *