या दोन्हीतील फरक मी फॅंटसीज ॲण्ड ब्युटीज इन सेक्स या कादंबरीत लिहीला आहेच.. अगदी डीटेल मधे लिहीला आहे..
माझे अनेक वाचक मेसेज करतात , फोन करतात पण त्या सगळ्यामधे एकच गोष्ट कॉमन दिसते.. पुरूष म्हणतात ,स्त्री हवं तसं शरीरसुख देत नाही आणि स्त्रीया म्हणतात , तो फक्त सेक्स सेक्स करतो.त्याशिवाय त्याला दुसरं काहीही सुचत नाही.. खरं तर पुरुषाला स्त्री कळलीच नाही.
तिच्या मनात उतरुन तिच्या भावनांचा आदर करुन तिला फुलवुन रोमान्स ,फोरप्ले करत केलेला सेक्स तिला आवडतो..फक्त शरीरसुखासाठी जवळ आलेला पुरूष स्त्रीला आवडत नाही..
ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत नाही फक्त तिचं कर्तव्य करते आणि हे तिच्या स्पर्शातुन किवा वागण्याबोलण्यातुन पुरुषाला कळायला हवं पण दुर्दैवाने कळ्त नाही किवा पुरूष दुर्लक्ष करतात किवा जाणुन घेत नाहीत किवा अभ्यास नाही किवा पोहोच नाही म्हणुयात.. ती स्वतःहुन त्या पुरुषाकडे शरीरसुखासाठी मागणी करत नाही याचाच अर्थ काहीतरी चुकतय हे पुरुषानी ओळखायला हवं पण भारतात लैगिकता आणि रोमान्स याकडे विचित्र नजरेने पाहिलं जात असल्याने आणि स्त्रीला कमी लेखलं जात असल्याने वीर्य बाहेर आलं की झालं अशी पुरुषी मानसिकता असल्याने .. तिच्या समाधानाचं काय ?? .. तिच्या मानसिकतेचं काय ??.. यावर विचार करायला कोणाला वेळच नाहीआणि आपल्याला काय हवय किवा काय वाटतय हे स्त्री बोलत नाही त्यामुळे ती कायमच असमाधानी रहाते.. मौन नको तिथे कामी येत नाही.. काही शब्दांचे अर्थ योग्य ठिकाणीच वापरले जायला हवेत..
गेल्या आठवड्यात एक काउंसीलींग करत होते.. त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की मला रोज हवं आणि बायको देत नाही.पण त्या व्यक्तीने त्याची कारणे शोधायचा कधीही प्रयत्न केला नाही किवा मी काय सांगते हे त्याच्या मेंदुत जात नव्हतं. शिक्षणाचा अभाव , वाचन नाही , स्त्रीची मानसिकता समजून घेण्याची कुवत नाही , पुरुषी अहंकार या सगळ्यात त्याची फक्त वखवखलेली नजर दिसली.. शारीरिक सुख देणं घेणं ही पुजा असायला हवी , तो सोहळा असायला हवा.. निसर्गाने दिलेल्या सुंदर कलाकृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी ..
त्यातील सौंदर्य ,,स्वच्छता याबद्दल माहीती हवी.. प्रत्येक स्त्री पुरूष वेगळा त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरीही आपल्या पार्टनरच्या आवडीनुसार आपल्याला बदलता यायला हवं.. नको तिथे पुरुषार्थ दाखवुन दोघेही असमाधानी रहातात आणि मग विवाहबाह्य संबंधाकडे वळतात..बायकोपेक्षा मैत्रीण जास्त सुख देते म्हणतात..आणि तरीही मला विचारतात ,तुम्ही लैगिकतेवर का लिहीता ??.. सगळ्याना सगळं माहीत आहे तर मग स्त्री पुरुषांमधे या अडचणी का ?? .. हेही शास्त्र आहे.. समजून घ्या.. पैसे दिले की सगळं होत नाही.. लैगिकतेवर लिहीताना , बोलताना किवा अभ्यास करताना रोज अनेक प्रश्न समोर येत आहेत आणि त्यामुळे माझा अभ्यास होतो.. पण तरीही लोक आपलं ते सोडत नाहीत , बदलत नाहीत याचं वाईट वाटतं..वरवर सोपा वाटणारा विषय आतुन खूपच गहन आहे आणि त्याचे परिणामही तितकेच मोठे ..
कधीतरी तिला घेउन डेटवर जा.. कधीतरी बेड सजवा.. मंद म्युझिक लावा.. कधीतरी फक्त मिठीत रहा.. कधीतरी फक्त कॉफी आणि गप्पा.. कधी सरप्रायजेस द्या.कधी दोघे मिळुन एकत्र कुकींग करा.. दोघान्मधे बॉंडींग वाढवा.विचार शेअर करा.. मस्त पाऊस आहे मनसोक्त भिजाआणि मग जादु पहा..
सोच बदलो.. देश बदलेगा.. वाचन वाढवा.. निरीक्षण वाढवा
सोनल गोडबोले
.