सोमठाणा येथिल संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक मेळावा संपन्न

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील सोमठाणा येथिल संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक मेळावा दि .४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला , यावेळी पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला .

 

संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .

दि .४ ऑक्टोबर रोजी आयोजित शिक्षक पालक मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव चेतनभाऊ केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून कंधार नगरपालिकेचा माजी नगराध्यक्षा तथा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीस नांदेड दक्षिणचे सौ. अनुराधा चेतन केंद्रे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती . त्यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमास सोमठाणा,पोखर्णी,पटाचा तांडा ,दैठणा व मरशिवणी येथील पालक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *