कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते डॉक्टर जाधव हॉस्पिटल पर्यंतचा १०० फुटाचा रस्ता करण्यात यावा यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने व मारोती मामा गायकवाड यांच्या वतीने १० दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते .
उपोषणाच्या दहाव्या दिवशी तहसीलदार कंधार राम बोरगावकर यांनी सदरील दुकानांना शील ठोकल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते ,परंतु आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी कंधार शहरातील शील ठोकलेली काही दुकाने दुकानदारांनी चालू केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे . व तहसीलदाराच्या आदेशाला दुकानदारांनी केराची टोपली दाखवत , शिल ठोकलेली दुकाने खोललीच कशी याची चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे .
कंधार शहरातून शंभर फुटाचा रस्ता जावा त्या मध्ये येणारे अतिक्रमण पाडण्यात यावे यासाठी मारोती मामा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता .
सदरील रस्त्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर येत असल्याने सदरील शॉपिंग सेंटर पाडण्यात यावे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पाठीमागे असलेला पुढे यावं म्हणून उपोषण करण्यात आलं होतं दहा दिवस असलेल्या उपोषणाने मारोती मामा गायकवाड यांची प्रकृती खालावली तेव्हा मातंग समाजाच्या महिलांनी १० व्या दिवशी तहसीलदार राम बोरगावकर यांना घेराव घातला व या प्रकरण तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली होती , याची दखल घेऊन तहसीलदार राम बोरगावकर यांनी सदरील महिलांना आश्वासन देऊन कंधारच्या त्या वादग्रस्त शॉपिंग सेंटरला शील ठोकले होते .
परंतु आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी शासनाची व उपोषणकर्त्याची दिशाभुल करून काहीं दुकानदारी बनवाबनवी करत दिवसभर दुकाने खोलून चालू ठेवली याकडे तहसीलदार राम बोरगावकर काय भूमिका घेतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .