नांदेड प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील अगदी टोकावर असलेल्या कौडगाव येथे दिवसभर अवैद्य रेती उपसा केला जातो व रात्रीच्या वेळी रेती वाहतूक करून इतर ठिकाणी नेल्या जात आहे त्यामुळे गोदावरीचे पात्र धोक्यात आले आहे कौवडगाव येथे शासनाने कुठल्याही प्रकारे लिलाव केला नसतानाही या ठिकाणी दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळू उपसा तराफ्यावर केला जात आहे कौवडगाव गोदावरी नदी पात्रात दहा ते पंधरा मोठे तराफे असून या साह्याने 100 मजूरा द्वारे तराफ्यावर दिवसभरात शेकडो अवैद्य वाळू उपसा केला जात आहे यात शासनाचा हजारो चा महसूल बुडत असून या ठिकाणचे तलाठी अवैद्य वाळू उपसाला आर्थिक व्यवहारात पोटी पाठबळ देत असून या वाळू उपशाकडे ते फिरकू नही बघत नाही त्यामुळे गावकर्या यातून तलाठी हे आर्थिक व्यवहारात पोटे यांच्याकडे कानाडोळा करत असल्याचे बोलल्या जात आहे पण तहसीलदार देखील या वाळू उपसा कडे फिरूनही बघत नाहीत व कौडगाव परिसरात आतापर्यंत अवैध वाळू उपसा प्रकरणी कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही त्यामुळे तहसीलदारापासून मंडळ अधिकारी व तलाठी यांचे हात ओले केले असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे
मा जिल्हाधिकारी साहेब यांनी कौडगाव येथे दिवसाढवळ्या होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करून वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाचा महसूल बुडणाऱ्या वाळू माफिया कडून महसूल वसूल करावा व अवैध वाळू उपशाला आर्थिक व्यवहारापोटी त्यांच्याकडे कानाडोळा करणाऱ्या तलाठ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेचे नांदेड हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी आज जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे लोहा तालुक्यातील होत असलेल्या अवैद्य वाळू उपसा प्रकरणी निवेदन देऊन कौडगाव येथील होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा असेही निवेदनात विक्रम पाटील बामणीकर यांनी म्हटले आहे .
याठिकाणी अवैध वाळू उपसा एका राजकीय नेत्याच्या पाठबळामुळे होत असल्याचे येथील नागरे बोलून दाखवत आहे त्यामुळे तहसीलदार देखील यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे कौडगाव येथे गेल्या वर्षी देखील हजारो ब्रास अवैध वाळू उपसा करून साठवणूक करण्यात आली होती तरीदेखील तहसीलदार यांनी यावर कारवाई करण्याचे धाडस केले नाही ? त्यात जिल्हा अधिकारी यांनी कौवडगाव येथे होत असलेल्या व साठवणूक केलेल्या अवैध रेतीचा पंचनामा करून कारवाई करावी अवैध वाळू उपसा बंद करावा व त्याचा तात्काळ लिलाव करावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते पण तहसीलदार परळीकर यांनी कौडगाव परिसरात गेल्या दोन वर्षात कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे या परिसरातील वैद्य वाळू उपसा करणार्याने आर्थिक व्यवहारापोटी सर्वांना हाताशी धरून राजरोसपणे कौडगाव येथे वाळू उपसा चालू आहे त्यासाठी माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात विक्रम पाटील बामणीकर यांनी म्हटले आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.