भांडवलदार आ
देशाची सत्ता मोजक्या धर्मांध लोकांच्या हातात आहे हे सत्य असून मोदी नावाला प्रधानमंत्री आहेत हे पूर्ण सत्य आहे, देशात न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, हा समज सत्य नसून तो गैरसमज आहे, आपल्या देशात कोणतीही संस्था स्वतंत्र किंवा निरपेक्ष नाही. ते कोणाच्या तरी कब्जात आहे, सत्तेची खरी सुत्रे भांडवलदार लोकांच्याच हातात आहेत.म्हणून भांडवलदारांना सोईचे होतील असे निर्णय सरकार घेत आहे. शिक्षण, रोजगार निर्मिती यावर खर्च न करता अनावश्यक बाबींवर करोडो रुपये उधळणे चालू असून या सर्व बेबंदशाहीमुळे SC ST OBC अल्पसंख्याक तरुण सरकारच्या षडयंत्राचे बळी ठरत असल्याचा आरोप लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद, नगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी देण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय अन्यायकारक असून या निर्णयामुळे शिक्षणापासून बहुजन समाजाला पुन्हा वंचित ठेवल्यास मुठभर लोकांच्याच हातात व्यवस्था केंद्रीत होणार आहे. सरकार बहुजन समाजाला गुलामीत ठेवण्यासाठी सरकारी नौकर्यांचे कंत्राटीकरण,शाळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेत आहे.
सर्वच क्षेत्राचे खासगीकरण होत असेल तर मग यापुढे निवडणुकांचा खर्च, मंत्री, सरकार कोणासाठी.? सरकार चालविण्याचे कंत्राट अंबानी, अडाणी यांना देऊन टाका असा सल्ला प्रा.रामचंद्र भरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.