मुखेड -अभ्यास मंडळ ही लोकशाहीला पूरक काम करणारे असतात. प्रत्येक व्यक्तीला लोकशाही बद्दल ज्ञान असणे गरजेचे आहे. राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागी होणे हे महत्त्वाचे आहे.राज्यकर्ते व जनता यांनी सदसद विवेक बुद्धी वापरून राजकारण केले तर देशातील बरेच प्रश्न सुटतील.समाज स्थिर असल्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही. राज्यशास्त्राचे जनक अरिस्टाॅटल यांनी राज्यशास्त्राला सर्व शास्त्राचे शास्त्र मानले.राजकारणाचे चांगले व वाईट परिणाम समाजावर होत असतात. व्यक्तींच्या गरजांची पूर्तता करणे हे राज्याचे प्रथम कर्तव्य आहे.व्यक्तीला चांगले जीवन मिळवून देणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक काळात प्रत्येक देशात चांगले जीवन जगण्याची भावना असते. राज्यकर्ता चांगला निवडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे.महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वाभिमानाची व त्यागाची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण,कै.वसंतराव नाईक यांसारख्या राज्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने व त्यागभावानेने काम केले पण अलीकडे सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता असे चित्र दिसते आहे. देशाला भूगोल आहे पण महाराष्ट्राला भूगोला बरोबर इतिहास आहे. राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पाहीले जात आहे. देशात लोकशाही संस्कृती विकसित करण्याचं काम महाराष्ट्राने केलं असे प्रतिपादन शंकरनगर येथील महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.राजेंद्र शिंदे यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि.नांदेड येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राज्यशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन व अतिथी व्याख्यान प्रसंगी ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थित्यंतरे’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.हरिदास राठोड म्हणाले की अरिस्टाॅटल यांनी केवळ राज्यशास्त्र या विषयातच योगदान न देता अनेक विषयात योगदान दिले.त्यांचे मोठेपण यात आहे की त्यांना आभाळाएवढे शिष्य निर्माण करता आले. अभ्यास मंडळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांनी विषयाच्या परिषदा घेणे, संशोधनाला चालना देणे, आपले सहकारी विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित करणे, इतर संस्थांशी एम.ओ.यू. करून त्यांच्या विषयीचे ज्ञान मिळविणे. विद्यार्थी संसदेचा अभ्यास करणे या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यावा.केवळ कार्यकर्ते न बनता चांगले नेते व चांगला माणूस बना कुणाचा तरी जयजयकार करण्यात आपला अमूल्य वेळ न दवडता या वयात अभ्यास करा. चांगल्या कामासाठी मित्र मंडळ स्थापन करा असा सल्ला त्यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शंकरय्या कळ्ळीमठ यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली. पाहुण्यांचा परिचय प्रा.डाॅ. व्यंकट चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा.डाॅ.कविता लोहाळे यांनी केले तर आभार प्रा.बालाजी राठोड यांनी मानले.
यावेळी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. या मंडळात राचुटकर ओमकार (अध्यक्ष)काचेबोईनवाड प्रकाश (उपाध्यक्ष) मस्कले शिवप्रसाद (सचिव )बोईनवाड बालाजी (सहसचिव ) आडगूळवार नागोराव, कु.सोनकांबळे वंदना,कु.राठोड सविता, सोनकांबळे वैभव, मरेवाड मारुती, राठोड बालाजी, देवकते धोंडू तात्या ( सदस्य )यांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. बळीराम राठोड, नॅक समन्वयक प्रा.डाॅ. उमाकांत पदमवार, प्रसिद्धी प्रमुख प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डाॅ.नागोराव आवडे,,सह स्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.अरूणा ईटकापल्ले,माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे,प्रा.एस.बाबाराव,प्रा.डाॅ.वसंत नाईक,प्रा.डाॅ. महेश पेंटेवार, प्रा.डाॅ. पंडित शिंदे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ. निवृत्ती नाईक, प्रा.डाॅ.गंगाधर मठपती, प्रा. श्रीकांत जेवळे,प्रा.डाॅ.संजीव रेड्डी,प्रा.डाॅ.डी.सी. पवार, प्रा.डाॅ.मदन गिरी,प्रा.डाॅ. सरोज गायकवाड,प्रा. सुनील पवार, प्रा.डाॅ.महेंद्र होनवडजकर,सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.