कंधार ; प्रतिनिधी
आज १४ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालयाला कंधार तहसीलचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी आकस्मिक पणे भेट दिली यावेळी वैद्यकीय अधिक्षक राजू टोम्पे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी नायब तहसीलदार ए. एम.परळीकर, तहसीलचे कर्मचारी ज्ञानेश्वर राखे,समीर मिर्झा यांची उपस्थिती होती .
रुग्णालयातील पुरुष कक्ष,स्री कक्ष,प्रसुती कक्ष,प्रसूती पश्चात कक्ष,दंतचिकित्सक विभाग,आय सी टी सी विभाग विशेषतः संडास बाथरूम स्वच्छ आहेत की नाहीत याची पाहणी केली .
तसेच क्ष-किरणविभाग अपघातविभाग शस्त्रक्रियागृह,पाकगृह, प्रयोगशाळा,औषधी भांडार,या सर्व विभागात जाऊन प्रत्येक्षात पाहणी करून आढावा घेतला.
औषधी साठा तसेच आवक जावक रेकॉर्डची पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील असलेल्या अडचणी ऐकुन घेतल्या व स्वच्छेते सह चांगल्या बाबीवर समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले डॉ.संतोष पदमवार डॉ.श्रीकांत मोरे, डॉ. शाहीन बेगम ,डॉ.गजानन पवार,डॉ.उजमा तबसुम,डॉ.अरुणकुमार राठोड,डॉ.नम्रता ढोणे, डॉ.दत्तात्रय गुडमेवार ,डॉ.निखहत फातेमा डॉ.प्रज्वला बंडेवार व कर्मचारी श्री.ज्ञानेश्वर बगाडे (सहाय्यक अधीक्षक), श्रीमती.शीतल कदम(अधिपरिचरिका),आश्विनी जाभाडे,मयुरी रासवते,केळकर शिल्पा,विष्णुकुमार केंद्रे,सुनीता वाघमारे, आऊबाई भुरके, (अधिपरिचारिका), प्रियंका गलांडे ,सुरेखा मैलारे,औषध निर्माण अधिकारी श्रीमती.वंदना राठोड,श्री.दिलीप कांबळे,श्री.शंकर चिवडे,श्री.आशिष भोळे,श्री.कोंडाआप्पास्वामी ,श्री.सचिन ठाकूर (प्रयोगशाळातंत्रज्ञ)
श्री विठ्ठल धोंडगे (एक्स-रे टेक्निशियन)
श्री.राजेंद्र वाघमारे,( समुपदेशक),
श्री. प्रदीप पांचाळ(ICTC),श्री.संतोष आढाव.
चालक श्री.अशोक दुरपडे,श्री.दत्तात्रय सोनटक्के,सर्व सफाई कामगार मावश्या,राहुल गायकवाड,अमोल बगाडे उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .