शिराढोण येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने श्री. भीमाशंकर यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन

उस्माननगर ( लक्ष्मण कांबळे )

उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता. कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिमवंत केदार ञवैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री १००८ जगदुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी (शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षर
शिवाचार्य महाराज शिराढोणकर) यांच्या सान्निध्यात दि. १५ऑक्टोबर २०२३ ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये विशेष म्हणजे २३ ऑक्टोंबर २०२३ रोज सोमवारी आश्विन शुद्ध ९ या दिवशी रात्री ७ ते १० पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम व रात्री १० ते १ वाजेपर्यंत गावातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. व रात्रौ ३ वा. श्री. ब्रहामी मुहूर्त भीमाशंकर महाराजांच्या पालखीचे अग्निकुंडातून प्रवेश होईल . त्यानंतर यात्रेला प्रारंभ होत आसतो.
शिराढोण येथे अनेक वर्षापासून नवरात्र उत्सव व भीमाशंकर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या यात्रेत महाराष्ट्रासह ,अन्य राज्यातून श्रध्दाळू भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून दर्शन घेतात.व र्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या हर्षउल्लासात ही यात्रा भरविण्यात येत आहे.

 

 

या यात्रेला खूप दूरवरून यात्रेकरूंची गर्दी होत असते. विविध राज्यातून भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमवतः केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री १००८ जगदुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी (शिवाचार्य रत्न श्री.ष.ब्र.प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर) यांच्या सानिध्यात १५ /१०/२०२३ ते २४ / १०/ २०२३ दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज शिवपाठ, दुर्गा सप्तसती, पारायण, रेणुकविजय पुराण, अखंड, भगवन्नाम सप्ताह, रात्री ८ ते ११ शिवकिर्तन, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात दि.१५ ऑक्टोंबर पासून दररोज संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दि. १५ ऑक्टोंबर रोज रविवार ह्या दिवशी शि.भ.प. शिवानंद हांडरगुळे दापशेडकर, दि.१६ ऑक्टोंबर रोज सोमवार ह्या दिवशी शि.भ.प. बालाजी भोस्कर गुरूजी बेद्रीकर, दि. १७ ऑक्टोंबर रोज मंगळवार ह्या दिवशी शि.भ.प. विकास महाराज दसवाडीकर दि. १८ ऑक्टोंबर रोज बुधवार ह्या दिवशी शि.भ.प. अमोल महाराज लांडगे गुरुजी दि. १९ ऑक्टोंबर रोज गुरूवार ह्या दिवशी शि.भ.प. बालाजी स्वामी पार्डी ( लोहा )दि. २० ऑक्टोंबर रोज शुक्रवार ह्या दिवशी शि.भ.प. स्वातीताई माधव तमसशेट्टे दि. २१ ऑक्टोंबर रोज शनिवार ह्या दिवशी शि.भ.प. मन्मथ अप्पा डांगे गुरूजी दि. २२ ऑक्टोंबर रोज रविवार शि.भ.प.किशोरीताई तागबिडकर दि. २३ ऑक्टोंबर रोज सोमवार ह्या दिवशी शि.भ.प. विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रसादावरील कीर्तन होणार आहे .

 

दि.२४ ऑक्टोबर रोजी मंगळवार ह्या दिवशी विजयादशमी सकाळी ११ वाजता भीमाशंकर महाराज यांची पालखीचे विसर्जन व जगदुरूंचे आशीर्वचन होईल. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जगदुरूंचे आशीर्वाचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व समस्त गांवकरी शिराढोण यांनी केले आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *