माझे मित्र प्रा.भगवान आमलापुरे यांचा गारपीट हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला.हा कविता संग्रह सरानी त्यांची थोरली मुलगी कु.धनश्री हिच्य वाढदिवशी प्रकाशित केला..!! आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या कविता संग्रहाचे प्रकाशन करणारा
बाप म्हणजे एक अवलियाच म्हणावा लागेल..!!
आज सहजच सरांची भेट घ्यावी.त्यांच्या सोबत निवांत गप्पा माराव्या म्हणून फोन केला.सर आले ते हातात गारपीट कविता संग्रह घेऊनच..!!
कविता संग्रह चाळत चाळत गप्पांचा फड रंगला व त्यातूनच त्यांनी लिहिलेल्या कवितांवर चर्चा झडत गेली.
त्यातून कवितेच मर्म आणि कविमनाच दर्द उलगडत गेल.
घरात आई..
तिच गडी ,तिच बाई..
मधीच शेजार्याशी वाद रं..
जीवन वाटत नाही साजरं..
या ओळी रविवारीय शब्द शिल्प या कवितेतील आहेत.यातुन कवीने आज समाजात जगत असताना
जी घुसमट पाहायला मिळते ती व्यक्त केली आहे.
तुमची हवेली..
तुमची चमेली..
दिवसा ढवळ्या उभ्याने जळो..
पण आता तरी माणुसकी कळो..
या ओळी संवादाचा मोट या कवितेतील आहेत..!!
यातून कवी आपल्या मनात खदखदत असलेल्या भावना विद्रोह रुपात प्रकट तर करतोच पण समाजकारणात व
राजकारणात जी अवस्था आज पाहायला मिळते त्यावर
आसुड ओढतो असे म्हणले तर चूकीचे होणार नाही..!!
परतीच्या पावसा..
पुरव माझ्या हौसा..
आधीच आर्धी निर्धी जमीन विकली..
अन् उरलेली जर शेती पिकली..
तरच काही खरं हाय..
नाही तर जगण्यापेक्षा..
वेगळा विचार केलेला बरं हाय..!!
या ओळी आहेत शब्द आरती या कवितेतील..!!
या ओळीतून जणू काही कवी आपल्या मनातील भावना
व्यक्त करताना समग्र शेतकरयांची व्यथा समाज व शासन
यांच्या पुढे मांडतोय असेच कविता वाचनारयाला वाटत तर राहतेच पण कवी आपलीच व्यथा कवितेतून मांडतोय
ही भावना सर्वसामान्या मधे दृढ होतेय..!!
माय माझ आजघडीला..
सर्व काही चाललय ओके..
पण एवढं मात्र खरंय..
माझे बदलून पडत आहेत ठोके..
या ओळी अबाळ या कवितेतील आहेत.या ओळीतून कवी आपल्या मायीला दिलासा देतानाच तो दिलासा
खरा नाही वास्तव त्यापेक्षा खुपच वेगळे व दाहक आहे.
त्यामुळेच कदाचित कवीच्या ऋदयाचे ठोके वेगळे पडत असावेत असा वाचकांचा समज झाला तर नवल वाटायला नको..!!
अशा एका पेक्षा एक सरस कविता कविने आपल्या गारपीट या कविता संग्रहात शब्दबद्ध केल्या आहेत..!!
कविता संग्रह वाचताना वाचक नक्कीच अंतर्मुख होतो
हीच कवीच्या कवितेची खर्या अर्थाने ताकद आहे.असे वाटते.हेच या कविता संग्रहाचे मर्म आहे.व त्यांच्या कवितेतून त्यांनी जी सर्व सामान्याची व्यथा मांडली आहे.
त्याचा आवाका ही तसा दांडगा आहे..!!
आपल्या पहिल्याच कविता संग्रहातून त्यांनी तो समर्थपणे
वाचका समोर ठेवण्यात नक्कीच येश मिळवले आहे..!!
असे कवितेचा चाहता, वाचक म्हणून वाटते..!!
सर तुमच्या पहिल्याच कविता संग्रहाला भरभरून शुभेच्छा देतो.व या पुढेही तुमची लेखणी समाजहितासाठी
परजत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो..!!
गारपीट हा कविता संग्रह म्हणजे अस्वस्थ मनाचा हुंकार आहे.यातुन जशी संवेदनशीलता प्रकट होते तसेच विद्रोहाचे हूंकार ही उमटत जातात.हीच संवेदनशीलता
व विद्रोहाचे हूंकार समाज मनाला नव्या आशे बरोबरच
संघर्षाची प्रेरणा देतात असे म्हणले तर वावगे ठरणार नाही..!!
सर मी काही समीक्षक नाही.पण तुमचा कविता संग्रह वाचल्या नंतर मनात जे भाव निर्माण झाले तेच शब्द रूपाने प्रकट झाले.एवढे मात्र खरे हे प्रांजळ पणे कबुल करतो व तुमचे मनापासून अभिनंदन करतो..!! व तूम्ही भविष्यात ही लीहत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो..!!
गारपीट या कविता संग्रहाला पूनश्च एकदा शुभेच्छा देतो..!!
सुनील खंडाळीकर..
अहमदपूर जी.लातूर..!!