विभागीय स्पर्धेसाठी माणिक प्रभू विद्यालयाचे चार विद्यार्थी पात्र

 

(गऊळ ;शंकर तेलंग) ;
जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत यश मिळवून माणिक प्रभू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत . यात सपना विठ्ठल केंद्रे २०० मी.धावणे , साक्षी संजय मुडे ४०० मी. धावणे , प्रज्ञाताई प्रभाकर व्यवहारे ८०० मी. धावणे व ओमप्रसाद नाथराव कागणे ३००० मी. धावणे . सदरील स्पर्धेत या सर्वांनी प्रथम क्रमांक पटकावत विभागीय क्रीडास्पर्धेतील धावणे या क्रीडाप्रकारात आपले स्थान निश्चित केले आहे .
संस्थेचे अध्यक्ष मा .श्री मनोहरराव बापुराव पा .तेलंग सचिव श्री. डॉ. शाम बापुराव पा. तेलंग , उपाध्यक्ष श्री बालाजीराव पा .वडजे , मुख्याध्यापक श्री . गिरे सर , पर्यवेक्षक मुंजेवार सर सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी खेळाडू विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षक श्री सुधाकर जाधव व रझाक शेख यांचे अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *