कंधार : (प्रतिनिधी )
नवरात्र महोत्सवा निमित्त आर्य वैश्य महिला मंडळ कंधारच्या वतीने नगरेश्वर मंदिर कंधार येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा चे उदघाटन इंजि.सौ.राधाताई कृष्णाभाऊ भोसीकर,यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थणी सेवानिवृत्त प्राचार्या सौ.राजेश्री शिंदे,होत्या या कार्यक्रमास आर्य वैश्य महिला मंडळ अध्यक्ष सौ.रोहिणी गंजेवार ,सचिव सौ.अनिता मामडे,उपाध्यक्ष सौ.अनुराधा मुत्तेपवार सौ.श्रुती फरकंडे,कोषाध्यक्ष सौ.राजश्री फरकंडे,सल्लागार सौ.शुभदा बच्चूवार सौ.आंजलीताई पापीनवार आणि सर्व सभासद यांच्या उपस्थितीत होत्या.
आर्य वैश्य महिला मंडळ कंधारच्या वतीने विविध सामाजिक व संस्कृतीक उपक्रम कंधार शहरांमध्ये राबवले जातात महिलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे मोठ्या प्रमाणात कार्य देखील आर्य वैश महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी होत असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवरात्र महोत्सवानिमित्त कंधार शहरात मोठ्या प्रमाणावर आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रारंभी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ.रोहिणी गंजेवार यांच्या हस्ते सौ.राधाताई भोसीकर व इतर पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर आनंद नगरी मधील विविध स्टॉलला भेटी देऊन सौ राधाताई यांनी आनंदनगरीमध्ये आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल आणि विविध खेळांचे स्टॉल लावण्यात आले होते सदरील कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला*