कंधार ;
तालुक्यातील दिव्यांग बांधव , विधवा महिला ,वयोवृद्ध शेतमजूर, यांचा थकीत ५ टक्के निधी तात्काळ खात्यावर जमा करावा ,अर्थ सहाय्य योजनेचे व संगांयो ‘ योजनेत मंजूर करा या प्रमुख मागण्यासह दिव्यांगाचे प्रश्न निकाली लावण्यासाठी दि.७ सप्टेंबर रोजी कंधार तहसिल कार्यालयासमोर लॉकडाऊन आंदोलन दिव्यांगानी पुकारले आहे.
लॉकडाऊन काळामध्ये दिव्यांग,विधवा महिलांचे प्रश्न सोडवणूक केली जात नसल्याने दिव्यांग बांधवांच्या वतीने सदरील लॉकडाऊन आंदोलन प्रहार दिव्यांग संस्था च्या वतीने तहसील कार्यालयासमोर असल्याचे निवेदन तहसिलदार सखाराम मांडवगडे यांना देण्यात आले आहे.या निवेदनात ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगा चा पाच टक्के निधी खर्च करणे विलंब करणाऱ्या ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करावी, नगरपालिका कंधारच्या ५टक्के थकीत दिव्यांग निधी असून नगरपालीकेच्या मुख्याधिकारी निधी तात्काळ खात्यावर जमा करावा.
तसेच नगरपालिका अंतर्गत मोकळी जागा दिव्या साठी उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच रोजगार हमी योजनेचे नगरपालिका आणि ग्रामपंचायत मध्ये जॉब कार्ड देऊन शंभर दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. संजय गांधी योजना आणि अर्थसहाय्य योजना मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी, भेदभाव न करता मंजूर करावेत.यासह दिव्यांग व विधवा ,वयोवृद्धाच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर शेख दस्तगीर ,संगिता वाखरडकर,बाळु राठोड,फेरोज शेख रहेमान,शेख खुर्शीद आदीसह दिव्यांगाच्या स्वाक्षरी आहेत.