बहाद्दरपुरा ;
कंधार तालूक्यातील दिन दुबळ्यांची सेवा करणारे,मन्याड खोर्यातील शांतीचा महामेरु,कला महर्षि,केशवसखा माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या धर्मपत्नी,सोज्वळ,सुस्वाभावी,कुरुडे घराण्याची लक्ष्मी दिवंगत सौ.सुलोचनाताई गुरुनाथरावजी कुरुडे या माऊलीचा ८ सप्टेंबर २००३ रोजी हैद्राबाद येथे डेंगु रोगाने घात केला.सौ.सुलोचनाकाकू ह्या बहाद्दरपुरा नगरीचे माजी सरपंच भाई दत्तात्रयजी कुरुडे यांच्या मोतोश्री होत.
माझी दोन्हीही अपत्य कुमार दृष्टांत व कु दृष्टी त्यांच्या अंगाखाद्यांवर खेळत बालपण घालवले.दोघांनाही कानटोप्या स्वतःच्या हाताने आकर्षक शिवुन त्यांचा लाड केले.माजी आमदार सौभाग्यवती असुन सुध्दा सप्ताहात दोन-तीन दिवस माझ्या निवासस्थानी येत असत.पण एकदाही खुर्चीत त्या बसल्या नाहीत.
एकदम साधे राहणीमान.माझ्या प्रत्येक कलाकृतिस त्या दाद द्यायच्या.गुराखी गडावर जागतिक गुराखी साहित्य संमेलनात प्रदर्शनासाठी गुरुव्दारा व नामदेव महाराज मंदिर आणि कालप्रियनाथ मंदिराची प्रतिकृति तयार करत असतांना व माझ्या घरचे जाते सुंदर रंगवत असतांना तर त्या खुप कौतुक करत होत्या. कितीऽऽऽऽ छानऽऽऽ असे म्हणत गौरवोग्दार काढायच्या. त्या सावल्या वरुन अचुक वेळ सांगण्याचे तंत्र त्यांच्या कडे होते.माझी अधिश्वरी सौ.संगीता एमेकर हीच्यावर त्यांनी स्नुषागत जिव लावला.
पदरात गाठ बांधुन कांहीतरी देण्यासाठी हमखास आणायच्याच सणासुदीचे होते त्यांना थोडा ताप होता पण त्यांनी अंगावर काढत कुणाला सांगीतले नाहीच.सणाच्या काळात त्यांना बळेच दवाखाण्यात नेले.एक-दोन दिवस नांदेड येथे उपचार झाला.नंतर हैद्राबाद हलवण्याचे सांगताच हैद्राबादला नेण्याची तयारी सुरु झाली.हैद्राबादला जातेवेळी माझी अगदी लहा पाच-सहा महिन्याची मुलगी दृष्टीला कंधारला दवाखाण्यात आणले होते.
कंधारच्या माॅडर्न ड्रेसेसच्या पुढे माझी आई कु.दृष्टीला घेवुन उभी होती.ते पाहतांच सौ.सुलोचनाकाकू यांनी गाडी थांबवली गाडीतून हात बाहेर काढुन माझ्या मुलीस जवळ घेवून पापे घेवून त्या हैद्राबादला दवाखान्यात जातांना मुखात केशव मामा,बंधु माणिक ही दोन नावे घेत राहिल्या…..ती भेट शेवटचीच!डेंगु आजार एव्हढा शरीरास भिनला की,त्यांचे शरिर उपचाराला साथ देत नव्हते.अनंत चतुर्थीच्या एक दिवस आधी म्हणजे ८ सप्टेंबर २००३ या दिवशी जगाचा निरोप घेतला.ईकडे कुरुडे परिवारा सहित क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरी दु:ख सागरात बुडाली.९ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाची मिरवणुक होती.
आमच्या बहाद्दरपुरा नगरीच्या नगरवासीयांनी दुखवटा पाळून गणेश विसर्जन अगदी शांततेत म्हणजे ना वाजंत्री ना गोंगांट मोजक्याच गणेश भक्तांनी प्रोशिजर पुर्ण केले.त्यांना वडील मुले दत्तात्रय व सुधीर,मुली सौ.रेखा टेकाळे व सौ.विजया फुके सर्वात लहान कुमार ऊल्हास सहलीत काळाने हिरावला.घरातून जर बाहेर पाहायचे झाल्यास दाराच्या मागे उभे राहून त्या सौज्वल नजरेन पाहत.
उल्हास अकाली जाण्याचा धक्काच त्यांना असह्य झाला होता.तेंव्हा पासुन लहान लेकरांवर ते अधिकच प्रेम करून जीव लावत.
सौ.सुलोचना काकूंना विनम्र अभिवादनांजलि!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.