~~
ओबीसी, ओबीसी..तू बहुजन ओबीसी
ओबीसी ओबीसी..मी बहुजन ओबीसी !
लाचारी सोड
कुंपणे तोड
कर कणा ताठ
चल फटाफाट
जरी कठीण वाट
जरी धुके दाट
जरी उंच घाट
चल शिखर गाठ
तूच शिवाजी, तूच मावळा
हर हर ओबीसी..
ओबीसी, ओबीसी
तू बहुजन, ओबीसी !!धृ!!
बघ बळीराजाच्या जखमा
झाडास लटकली प्रेते
बेकार तरुण फिरणारे
ऐय्याश लुटारू नेते !
तू क्रांतीची ललकारी
सत्तेतील भागीदारी
ही न्यायाची नवी लढाई..
नायक ओबीसी..
ओबीसी, ओबीसी
तू बहुजन ओबीसी !!१!!
बेबंद घराणेशाही
सत्तेवर अंकुश नाही !
तू भीमरायाचा पठ्ठा
तू अन्यायावर रट्टा
तू करुणेचा सागर
समतेचा लोकजागर !
तुकाराम तू
निढळ घाम तू
सत्य, शुद्ध तू
फुले, बुद्ध तू
नवी झिंग तू
व्ही.पी. सिंग तू
तूच विठोबा, तूच पंढरी
वारीतील ओबीसी..
ओबीसी, ओबीसी..
तू बहुजन ओबीसी
ओबीसी, ओबीसी
तू बहुजन ओबीसी !
तो…बहुजन ओबीसी
हा…बहुजन ओबीसी
तू …बहुजन ओबीसी
मी…बहुजन ओबीसी
मानवतेचे पसायदान..
बहुजन ओबीसी..
ओबीसी, ओबीसी
तू बहुजन ओबीसी
ओबीसी, ओबीसी
मी बहुजन ओबीसी !!२!!
—
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर ०९/११/२०१८