जोगवा ; नवरात्रौत्सव विशेष

आई राजा, उदो उदो चा गजर करीत राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव पारंपरिक पद्धतीने सुरु झालेला आहे, शारदीय उत्सव म्हणजे शरद ऋतूत सुरुवातीला येतो,

आज जोगवा विषयी आपण या लेखात माहिती करून घेणार आहोत. ……
प्राचीन काळापासून जोगवा मागण्याची भारतात परंपरा आहे.
देवीचा कुलधर्म म्हणून जोगवा मागितला जातो, हा जोगवा मंगळवारी,शुक्रवारी, व पौर्णिमेला मागितला जातो,कमीत कमी पाच घरी जाऊन जोगतीण जोगवा मागतात.
त्या जोगव्यात तांदूळ, पीठ असे वेगवेगळे पदार्थ घेतले जातात,
यालाच जोगवा असे म्हणतात, आज सुद्धा जोगवा मागणाऱ्या जोगतीणला ग्रामीण भागात फार महत्त्व आहे. जोगवा मागणारी जोगतीण हातात बांबूची टोपली, कुंकू, भंडारा गळ्यात कवड्याची माळ, कपाळाला भरलेला मळवट, हातात हिरवा चुडा घालते. डोक्यावर पूर्ण पदर घेऊन अनवाणी पायाने देवीची गाणी गात गात जोगवा मागते,
*अनादि निर्गुण प्रगटली भवानी*। *मोह महिषासुर मर्दिना लागुनी*।।* *विविध तापांची कराया झाडणी* *भक्ता लागुनी पावसी निर्वाणी* *आईचा जोगवा जोगवा मागेन*।
*व्दैत सारुनी माळ मी घालीन ।।*हाती बोधाचा झेंडा घेईन*।
*भेद रहित वारीसी जाईन*।।
*नवविद्या भक्तीच्या करीन नवरात्रा*। *करून पोटी मागेन ज्ञान पुत्रा*।।
एकनाथ महाराजांनी आईचा जोगवा मागेन हे पद सर्वज्ञात आहे.
*जोगवा म्हणजे देवीचा कृपाप्रसाद होय* जोगवा म्हणजे भीक नव्हे; जोगवा मागणारी जोगतीण आपल्या कुलाचाराला सुख मिळावे म्हणून जोगवा मागते, घरातील मुलाबाळांना सुख समाधान ,आरोग्य ,ऐश्वर्य, धनसंपत्ती मिळण्यासाठी देवीकडे जोगवा मागितला जातो, मी हा जोगवा मागते वेळेस भेद रहित जोगवा मागेन , सर्व षड्रिपू पासून (मोह,मद,मत्सर,अंहकार ,लोभ, माया) दूर राहिन,सर्व समाजामध्ये समानता असावी ,कोणी लहान- मोठा नाही, असा त्याचा भावार्थ आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या मोठ्या बंधू कडे निवृत्ती नाथा कडे मागने (पसायदान) मागतात. आता विश्वात्मके देवे ,हे परमेश्वरा आम्ही जे मागणं मागतो ते आम्हाला दे,
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो *ज्यांचे कर्म जसे असेल ;तसे त्यांना फळ दे* असं मागणं मागतात, जगद्गुरु संत तुकाराम महाराज परमेश्वराला *हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा*।।असं मागणं मागतात तसेच जोगतीण सुद्धा भेद रहित जोगवा मागिते; त्यासाठी मी नवरात्रात उपवास,नवस करत आहे अशी ती जोगतीण आपल्या गीतातून सांगते,मी चांगल्या बोधाचा झेंडा हातात घेणार आहे, चांगल्या गोष्टीची उजळणी करणार आहे, म्हणून तर नवरात्रीच्या वेळी जोगवा मागितला जातो.
पूर्वीच्या काळी असणारी जोगतीण आणि सद्याची जोगतीण यांच्यामध्ये फरक आहे , पूर्वी जोगतीण देवीशी एकनिष्ठ राहून सर्वस्व आपले देवीला वाहून देवीच्या नावाने आयुष्य काढत होते, आता काळ बदलत आहे, यामधून अंधश्रद्धा वाढत आहेत. त्याचे समाजावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहेत, देवदास व देवदासी हे देवीच्या सानिध्यात राहत असताना यांची पाऊले वाईट मार्गाने पडत आहेत.या महिला समाजापासून दूर जात आहेत, परंपरा सोडून जाताना दिसत आहेत, कर्नाटक मधील यल्लम्मा देवीसाठी अनेक ठिकाणी देवदासी जन्मभर देवाची सेवा करण्या साठी सोडल्या जातात. खंडोबा देवाची सेवा करण्यासाठी वाघ्या-मुरळी सोडल्या जातात, नवस फेडण्यासाठी हे कृत्य काही जातीतील लोक करतात, अज्ञान,अंधश्रद्धा या गोष्टी मुळे या घटना घडतात, वरील सर्व पुरुष व महिलांचे जीवन वार्धक्यात खूप त्रासदायक व वेदनादायक जाते, तारुण्यात काही वाटत नाही, परंतु उतार वयात खूप हालअपेष्टा सोसाव्या लागतात, म्हणून श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, महाराष्ट्र शासनाने या प्रथेवर बंदी घातली आहे, तरीही काही प्रमाणात ती चालूच आहे.आज महिला सर्व क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करीत आहेत,पुरुषाबरोबर आपली योग्यता कार्यातून दाखवून देतात, अंतराळात झेप घेऊन कर्तृत्व सिद्ध करीत आहेत, म्हणून शिक्षण शिकून सावित्री व्हावे, आता चुल आणि मूल ही संकल्पना काही प्रमाणात मागे पडली आहे, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,*इतके अनर्थ एका अविद्येने केले* शिक्षण शिकलेल्या महिला सदसद्विवेकबुद्धीने वागतात, खरे -खोटे जाणून घेतात,
निरक्षर महिला अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून पडतात, इतरांची शिकार होताना दिसतात,शिक्षणा अभावी त्यांनी केलेले चुकीचे संस्कार त्यांच्या मुलांवर आपोआप पडतात,
ते देवदास म्हणून देवाचे भक्त होताना दिसतात,संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धेत घालविताात, केस वाढविणे, जटा बांधून ठेवणे, अस्वच्छ राहणे यातून जर्जर रोग जडतात, म्हणून संत गाडगेबाबांनी बहुजन समाज शिकावा त्यासाठी शाळा काढल्या, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,ताराबाई शिंदे,
समाज सेविका अनुताई वाघ, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड,
महर्षी धोंडो केशव कर्वे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, यांनी संपूर्ण आयुष्य महिलांच्या शिक्षणासाठी घालविले, यातून नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ उदयास आले, म्हणून सर्व महिलांना शिक्षणाची दारे खुली करण्यात आली आहेत, शेवटी एवढे सांगावे वाटते, श्रद्धेचा अतिरेक नको,
परत आपण प्रतिगामी आहोत, हे कळून येते, सर्व सण साजरे करा, पण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ही अपेक्षा,

 

शब्दांकन
*प्रा. विठ्ठल गणपत बरसमवाड*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी. ता. मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *