कंधार ; प्रतिनिधी
आज दि १९ रोजी सकाळी भारतीय जनता पार्टी नांदेड लोहा कंधार विधानसभा 100 वॉरियर्स प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कंधार येथील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे संपर्क कार्यालय येथे घेण्यात आली . यावेळी मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या 27 ऑक्टोंबर रोजी दौरा निमित्त सविस्तर माहिती, सरल ॲप, नमो अप, घर चलो अभियान, मेरा माती मेरा देश नवं मतदार नोदणी सविस्तर माहिती मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे यांनी दिली .
यावेळी प्रदेश सचिव देविदास भाऊ राठोड, नांदेड जिल्हाध्यक्ष ग्रामीण संतुकराव हंबर्डे ,सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड,सरचिटणीस डॉ माधवपाटील उच्छेकर ,लोहा विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, सरचिटणीस माणिकराव लोहगावे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणिताताई देवरे चिखलीकर ,,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजयजी देशमुख ,करीकर्णी सदस्य बाबुराव केंद्रे,प्रदेश राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकारामजी वारकड विधानसभा 100 वॉरियर्स प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.