मुखेड ; तालुक्यातील खैरकावाडी येथील भूमिपुत्र प्रा.विठ्ठल बरसमवाड यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मराठी भाषा व साहित्य सेवा गौरव पुरस्कार नुकताच दिला आहे, ते सध्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर येथील संस्थेत कार्यरत असून मराठी व इतिहास विषयांचे 22 वर्षापासून अध्यापन करत आहेत.
त्यांनी आजतागायत 1) हिंदूधर्मातील तीर्थक्षेत्रे
,2) क्रांतीपर्व 3)
इतिहासातील हिरे-माणके
4) पंचरत्ने,5) क्रांतीरत्ने,6) विठूमाऊली,7) सारथी सुविचार संग्रह,8) मराठी ज्ञानपीठाचे मानकरी या दर्जेदार ग्रंथाचे लेखन केले आहे .
तसेच आतापर्यंत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, व ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक 200 लेख दैनिक वर्तमान पत्र, साप्ताहिके,मासिके,दीपावली अंकातून लिहून पूर्ण केले आहेत, समाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य
करणाऱ्या कर्तृत्ववान महिला, कर्मचारी, दीन दलित दिव्यांग विद्यार्थी,शिक्षक, प्रगतशील शेतकरी, सैनिक यांना प्रेरणा देण्यासाठी खैरकावाडी (गोकुळवाडी) येथे विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठानची, स्थापना केली आहे, म्हणून त्यांना *आदर्श शिक्षक पुरस्कार* *राजे मल्हारराव होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत,तसेच क्रांतीरत्ने इतिहासातील हिरे माणके, विठूमाऊली या साहित्यिकृतीला *राज्यस्तरीय पुरस्कार* मिळाले आहेत, प्रा.विठ्ठल बरसमवाड यांच्या वाढदिवशी गणाचार्य मठाला त्यांनी ग्रंथ भेट दिल्यामुळे ,वरील सर्व कार्याची दखल घेऊन मठाधिपती गणाचार्य संस्थान मुखेड, येथील डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महंता कडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामुळे डॉ.धोंडिराम वाडकर डॉ.रामकृष्ण बदने, डॉ.दिलीप पुंडे, डॉ,शिवाजी इंगोले, डॉ,निर्मला आयतलवाड, प्राचार्य उत्तम खांडवी, लोकराज्यचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड,प्रा,मूगनाळे पी,डी अॅड उमाकांत वाडीकर,राजे छत्रपती अकॅडमीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर डुमणे, प्राचार्य एस, बी,अडकिणे, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, महंत विशुद्धानंदजी महाराज, सिध्दतिर्थधाम, ह.भ.प. पांडुरंग शास्त्री होकर्णकर महाराज,उद्योजक श्री बालाजी वट्टमवार , डॉ,ज्ञानेश ऐतलवाड,भानुदास शिरबरतळ,
सचिव मराठी पत्रकार संघ, अनिल कांबळे,तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.शिवाजी कोनापुरे
,तालुका प्रतिनिधी महेताब शेख, पत्रकार शेखर पाटील, सरपंच सरूबाई मोरे, खैरका, आदर्श माता श्रीमती लक्ष्मीबाई बरसमवाड, लेखिका कल्याणी बरसमवाड, बस्वराज चापुले तसेच पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.