Missing You..

Missing You..
हा शब्द किवा Love you..हा शब्द आजकाल इतका सर्रास वापरला जातो कि , कधीही कोणीही कोणालाही उठसुठ हे शब्द सहज टाईप करतो .. एकावेळी अनेक जणीना किवा अनेक जणाना हा शब्द वापरला जातो.. वापरणे हा शब्द मी इथे जाणूनबुजून वापरेन कारण त्या माणसाला त्या वेळेसाठी वापरलं जातं आणि एकीच्या सोबत असताना wp वर दुसरीला missing you .. हा मेसेज केला जातो..
खरं तर ती व्यक्ती त्या दोघीना नाही तर स्वतःला फसवत असते.. आपण दुसऱ्या कोणाला फसवु शकत नाही हेच खरं..
त्यामुळे समोरची व्यक्ती त्याच्याशी जेव्हा तशीच वागते त्यावेळी मात्र तो हवालदिल होतो..
एकावेळी एकच व्यक्ती अनेक जणींशी प्रेमाचं नाटक करते त्यानंतर कालांतराने एकही त्याच्यासोबत रहात नाही कारण प्रत्येकाचं उपभोगुन झालेलं असतं आणि शेवटी एकाकीपणा येतो त्यावेळी मात्र तो पस्तावतो.. आज सकाळीच एका वाचक सखीचा मेसेज होता की तिचा bf तिच्या मैत्रीणीलाही miss you असा मेसेज करतो मी काय करु मॅम ??.. तिला काय उत्तर द्यावं मला खरच कळलं नाही..
शुध्द प्रेम आहे की नाही ?? .. हा तिचा दुसरा प्रश्न आणि त्यापुढे ती म्हणाली , बियॉन्ड सेक्स या तुमच्या कादंबरीतील मिरा सागरच्या प्रेमावर मी कसा विश्वास ठेवु ??..
माझ्यासाठी सगळीच कोडी आहेत कधीही न उलगडणारी.. कारण आध्यात्मिक अंगाने विचार केला तर उत्तर वेगळं येइल.. विधीलिखीत म्हटलं तरीही उत्तर वेगळं येइल.. मानसिक विकृती किवा बदल असाही त्याचा अर्थ होवु शकतो..किवा बदला हेही कारण असेल..किवा गेल्या जन्माशी याचा काही संबंध असावा का तर असुही शकतो किवा मानसिक फसवणूक हेही कारण असु शकतं.. किवा समजा तिने त्याला सोडलं तर तिला पुढे जाऊन अजुन चांगली व्यक्ती मिळु शकते.. त्यामुळे तिने सकारात्मकतेने पुढे जाऊन योग्य निर्णय घ्यावा आणि तिच्या मैत्रीणीने सुध्दा .. मग त्याचं काय ??.. त्याला सवय असेल तर तो हेच करत रहाणार आणि शेवटी हातात धुपाटणं येणार हे नक्की..
जीव ओवाळून टाकावं असं प्रेम आहे की नाही तर नक्कीच आहे पण ते मिळायला आपण जीव ओवाळून प्रेम करायला हवं ना .. खरच तो मिस करतो की काहीतरी लिहायचं म्हणुन missing You लिहीतो हे ओळखणं खूपच अवघड आहे .. पण एक मात्र नक्की की भगवंतावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती ला भगवंत कायम मिस करेल आणि तो त्या व्यक्तीवर कायम प्रेम करेल.. प्रेम हेच एक कोडं आहे.. ज्याला सुटलं तो सुखी .. जो आयुष्यभर सोडवत बसला तो अडकला आणि जो फार अपेक्षा न ठेवता प्रेम करत राहिला तो कायमच सुखी झाला.. प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं सेम असतं..
मलाही रोज अनेक मेसेजेस असतात , त्यात love you . Like you.. missing You हेच शब्द असतात पण ते माझ्या वाचकांकडून असतात त्यामुळे ते खरे असतात कारण त्याचं माझ्या लेखणीवर प्रेम असतं , ते माझ्या विचारांवर प्रेम करतात.. त्यामुळे प्रेम करायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण कोणाच्या भावनांशी खेळायचा अधिकार कोणालाही नाही..
कायम प्रेमात रहा.

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *